अखेर लेबर कॉलनीत पाडापाडी सुरू, 338 घरांवर बुलडोझर; स्थानिकांना अश्रु अनावर 

 

औरंगाबाद – शहरातील लेबर कॉलनीवर प्रशासनाकडून सकाळी 6 वाजल्यापासून तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ याठिकाणी लोक वास्तव्यास होते. तोडक कारवाईमुळे परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.

लेबर कॉलनीतील 70 टक्के सदनिका मंगळवार सायंकाळपर्यंत रहिवाशांनी स्वत:हून रिक्त केल्या. कॉलनी सोडताना अनेकांना अश्रू अनावर झाले. तीन पिढ्यांची नाळ शासन आणि प्रशासनाने तोडल्याची टीका सदनिकाधारकांनी केली. त्यांचा संसार अक्षरश: रस्त्यावर आला आहे, अनेकांनी राहण्यासाठी घरे नाहीत. आता आम्ही कुठे जाणार, असे सांगताना अनेकांना अश्रू अनावर झाले. सकाळी 6 वाजल्यापासून प्रशासन कारवाईसाठी पोलीस, महापालिका, बांधकाम विभागांच्या पथक जेसीबीसह याठिकाणी कारवाई करत आहे.

पाडापाडीसाठी ही यंत्रणा –

अधिकारी – 95

पोलीस कर्मचारी – 200

मनुष्यबळ – 400

जेसीबी – 12

पोकलेन – 5

रुग्णवाहिका – 8