हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पंधरा दिवसांपासून करमाळा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत होती. आता पर्यंत तिघांचे बळी घेतले. नरभक्षक बीबट्याला ठार मारण्यासाठी वन विभागाने सहा शार्पसूटरची नियुक्ती केली होती. अखेर आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
नगर, बीड, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात अनेकांचा बळी घेऊन दशहत पसविणारा हा बिबट्या आज सायंकाळी मारला गेला. करमाळा तालुक्यातील वांगी शिवारात पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत वन विभागाचे शार्प शूटर चंद्रकात मंडलिक यांनी त्याला टिपले. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू होती.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी, बीड जिल्ह्यातील आष्टी आणि सोलापूर जिल्ह्याती करमाळा तालुक्यात या बिबट्याचा उपद्रव सुरू होता. या भागात त्याने १२ जणांचे बळी घेतले होते. एकट्या करमाळा तालुक्यातच तीन बळी घेतले होते. पिंजरे लावूनही तो सापडत नव्हता. उलट माणसांवर आणि प्राण्यांवर त्याचे हल्ले सुरूच होते. त्यामुळे त्याला पकडण्याचा आणि नाहीच सापडला तर ठार करण्याचा आदेश मुख्य वनसंरक्षकांनी दिला होता. त्यानुसार या बिबट्याला ठार करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’