हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Financial Changes : आता उद्यापासून मार्च महिना (1 मार्च 2023) सुरु होतो आहे. याबरोबरच या महिन्यांत असे अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा आपल्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. हे लक्षात घ्या कि, 1 मार्चपासून अनेक नवीन नियम लागू होणार आहेत, जे आपल्या महिन्याच्या खर्चावर मोठा परिणाम करतील. मार्च महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्य किंमती, बँकेचे कर्ज, सोशल मीडिया इत्यादींसहीत अनेक महत्त्वाचे बदल दिसून येतील. तसेच, ट्रेनच्या वेळापत्रकातही बदल होऊ शकतात. चला तर मग पुढील महिन्यात कोणकोणते मोठे बदल होणार आहेत ते जाणून घेउयात…
मार्चमध्ये 12 दिवस बँका राहणार बंद
मार्चमध्ये होळी आणि नवरात्रीसहीत 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये बँकांच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. RBI च्या मार्च 2023 च्या कॅलेंडरनुसार, खाजगी आणि सरकारी बँका 12 दिवस बंद राहतील. Financial Changes
बँकेचे कर्ज महागण्याची शक्यता
RBI कडून गेल्या महिन्यांत रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून MCLR रेटमध्ये वाढ केली आहे. ज्याचा थेट परिणाम बँकांच्या कर्जावर आणि ईएमआयवर होईल. ज्यामुळे बँकाकडून कर्जाचे व्याजदर वाढवली जाण्याची शक्यता आहे. Financial Changes
ट्रेनच्या वेळापत्रकात बदल
या महिन्यात रेल्वेकडून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले जाईल. मार्चमध्ये त्याची यादी जाहीर केली जाऊ शकते. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 मार्चपासून हजारो पॅसेंजर ट्रेन आणि 5,000 मालगाड्यांचे वेळापत्रकही बदलले जाऊ शकते. Financial Changes
सोशल मीडियाशी संबंधित नियमांमध्ये बदल
अलीकडेच भारत सरकारने आयटी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. ज्याअंतर्गत आता ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आता भारताच्या नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच कोणत्याही धार्मिक भावना भडकावणाऱ्या पोस्टवर नवा नियम लागू होणार आहे. हा नवा नियम मार्चमध्ये लागू केला जाऊ शकतो. त्याच प्रमाणे जर चुकीच्या पद्धतीने पोस्ट केल्याबाबत युझर्सना आता दंड देखील भरावा लागू शकतो. Financial Changes
LPG आणि CNG च्या किंमती वाढण्याची शक्यता
इथे हे जाणून घ्या कि, प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला LPG, CNG आणि PNG गॅसच्या किंमती निश्चित केल्या जातात. गेल्या वेळी एलपीजी सिलेंडरच्या किंमतींत वाढ झाली नसली तरी यंदा सणासुदीमुळे दर वाढण्याची शक्यता आहे. Financial Changes
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 50 लाख रुपये
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत संमिश्र कल, तपासा आजचे नवे भाव
आपल्या Pan Card चा गैरवापर तर झाला नाही ना ??? घरबसल्या अशा प्रकारे तपासा
बाजारात धुमाकूळ घालायला येतोय OnePlus चा ‘हा’ स्वस्त फोन, असे असतील फीचर्स
Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया