भाजपच्या 4 महिला आमदारांना आर्थिक गंडा; पोलीस तक्रार दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आई आजारी असल्याचं कारण देत एक इसमाने भाजपच्या चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . यामध्ये चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले, नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे, पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ व जिंतूर मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे. या प्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मुकेश राठोड असं या असं सदर आरोपीचे नाव आहे. स्वतःची आई आजारी असल्याचे सांगत मुकेशने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. त्यानंतर मदत करण्याच्या हेतूने आमदार माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर आणि श्वेता महाले यांनी त्याला ऑनलाईन माध्यमातून आर्थिक मदतही केली. मात्र, तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर या महिला आमदारांनी त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सध्या ऑनलाईन दुनियेच्या माध्यमातून मोठमोठ्या लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने पाहायला मिळत आहेत. पण या बहाद्दराने थेट आमदारांनाच गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Leave a Comment