बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपामुळे पुढील आठवड्यात सलग ३ दिवस बँका राहणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । बँक कर्मचारी संघटनांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी पुढील आठवड्यातील ३१ आणि १ तारखेला देशव्यापी संप पुकारला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) दिलेल्या माहितीनुसार, या संपा दरम्यान सर्व कार्यालये व शाखांचे कामकाज सुरळीत करण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना केल्या आहेत. मात्र, या बंदचा बँक व्यवहारांवर परिणाम होणार असल्याचे एसबीआयने सांगितले. दरम्यान ३१ आणि १ तारखेच्या सापानंतर २ तारखेला रविवार येत असल्याने बँक व्यवहार सलग तीन दिवस बंद राहणार आहेत.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (यूएफबीयू) अंतर्गत येणाऱ्या ९ बँक कर्मचारी संघटना २ दिवसीय देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत. या संपामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर कॉंग्रेस, ऑर्गनाइजेशन ऑफ बैंक वर्कर्स, आणि नेशन ऑर्गनाइजेशन ऑफ बैंक ऑफिसर्स या ९ संघटना सहभागी होणार आहेत. संपा दरम्यान बँक व्यवहार प्रभावित होणार असून ग्राहकांनी आपली महत्वाचे व्यवहार आटोपून घ्यावे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

झेंड्यावर राजमुद्रा वापरल्यामुळे संभाजी ब्रिगेडची राज ठाकरेंच्या विरोधात सोनपेठ पोलिसांत तक्रारवाट

चुकल्यानंतर पावसात जोडीदार सोबत असला की बरं वाटतं, श्रीनिवास पाटलांची पुण्यात खुमासदार फटकेबाजी

जगातील सर्वात मोठी लोकशाही पंतप्रधान मोदी नष्ट करत आहेत; साप्ताहिक द इकॉनॉमिस्टची जहरी टीका

Leave a Comment