टीम हॅलो महाराष्ट्र । ऑनलाइन खाद्य पदार्थ डिलिव्हर करणाऱ्या प्रसिद्ध ‘झोमॅटो’ कंपनीने ‘उबर इट्स इंडिया’ कंपनीला विकत घेतले आहे. या व्यवहारानुसार, झोमॅटोनं उबर इट्सचा भारतीय व्यवसाय सुमारे ३५ कोटी डॉलर अर्थात २४८५ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. यामुळे झोमॅटोमध्ये आता उबरचा केवळ ९.९९ टक्के हिस्साच असणार आहे. भारतात कॅब सेवा पुरवणारी प्रसिद्ध कंपनी ‘उबर’चा खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या शाखेचा भारतात चांगला व्यवसाय होत नसल्यामुळं कंपनीने हा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे.
या व्यवहाराचे ग्राहक, व्यवसायिकांवर काय परिणाम होणार?
‘उबर इट्स’चा आता भारतात स्वतंत्र व्यवसाय अस्तित्वात राहणार नाही त्यामुळे त्यांच्या युजर्सना झोमॅटोच्या एपवर जोडण्यात येणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, भारतात उबर इट्सच्या कर्मचाऱ्यांना झोमॅटो आपल्यामध्ये सामावून घेणार नाही. त्यामुळे उबर इट्सचे सुमारे १०० एक्झेक्युटिव्हज उबरच्या इतर कंपन्यांमध्ये सामावून घेतले जातील किंवा त्यांना कॉस्ट कटिंगचा सामना करावा लागेल. मात्र, यावर झोमॅटो आणि उबर यांनी कोणतेही स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे.
‘उबरने का विकलं उबर इट्स?
‘उबर’च्या व्यवसायिक धोरणानुसार, जर कंपनी मार्केटमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानवर नसेल तर ती तो व्यवसाय कंपनी बंद करून टाकते. त्यामुळे याच धोरणांतर्गत उबर इट्स विकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, उबरच्या सुत्रांनुसार, कंपनीचे हे अधिग्रहण केवळ भारतातील उबर इट्ससाठीच आहे. जगातील इतर देशांमध्ये उबर इट्स आपली सेवा कायम ठेवणार आहे. कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की, हा व्यवहार केवळ उबर इट्ससाठी असून कॅब सेवेसाठी नाही.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
आंध्रप्रदेश बनणार ३ राजधान्या असणारं एकमेव राज्य
‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान
‘तुकडे-तुकडे गँग’ आम्हाला माहितीचं नाही; आरटीआय अर्जाला गृहमंत्रालयाचे उत्तर