सुपरस्टार रजनीकांत यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल; पेरियार यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळं आले गोत्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । दक्षिण भारतातील द्रविडी चळवळीचे जनक पेरियार यांच्याबद्दल दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी केलेल्या एका विधानावरून यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. पेरियार हे हिंदू देवदेवतांवर कठोर टीका करायचे. त्याच्या नेतृत्वाखाली १९७१ साली सलेममध्ये झालेल्या सभेच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र व सीतेचे विवस्त्र फोटो लावण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्यांच्यावर कोणीही टीका करायचे नाही,’ असा दावा रजनीकांत यांनी आपल्यात वक्तव्यात केला होता. ‘तुघलक’ या तामिळी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

या वक्तव्यानंतर तामिळनाडूत नव्या वादाला तोंड फुटलं आहे. द्रविडी पक्ष संघटनांनी रजनीकांत यांच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला आहे. रजनीकांत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, रजनीकांत मात्र त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. ‘पेरियार यांच्याविषयी मी जे काही बोललो ते पूर्णपणे सत्य आहे. त्याबाबतचे अनेक पुरावे आहेत. पेरियार यांच्या त्या सभेचं वार्तांकन करताना अनेक वर्तमानपत्रांनी हे सगळं छापलं होतं. त्यामुळं माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही,’ असं रजनीकांत म्हणाले. त्यामुळं आता हा वाद शमतो की चिघळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

‘उबर इट्स’ला ‘झोमॅटो’नं घेतलं विकत; तब्बल २४८५ कोटी रुपयांना झाला व्यवहार

अभिनेत्री पूजा हेगडेचा असाही एक चाहता; केवळ चॉकलेट देण्यासाठी ५ दिवस काढले रस्त्यावर

आंध्रप्रदेश बनणार ३ राजधान्या असणारं एकमेव राज्य‘तुकडे-तुकडे गँग’ आम्हाला माहितीचं नाही; आरटीआय अर्जाला गृहमंत्रालयाचे उत्तर

 

Leave a Comment