टीम हॅलो महाराष्ट्र । इराकने अमेरिकेच्या हवाई तळावर केलेल्यानंतर दोन्ही देशामधील तणाव वाढला आहे. त्यामुळं इराक-अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद भारतीय शेयर बाजारावर सुद्धा पडताना दिसत आहेत. आज बुधवारी सकाळी आशियातील शेअर बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने बाजार उघडताच ३५० अंकांची घसरण झाली. सध्या तो १८० अंकांच्या घसरणीसह ४०६९० अंकांवर आहे.
तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६० अंकांची घसरण झाली असून तो ११९९२ अंकांवर आहे. भारताप्रमाणेच आशियातील जपान, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातील बाजारांमध्ये घसरण अशीच पडझड पाहायला मिळत आहे. इराण-अमेरिका सध्या युद्धाच्या उंबरठ्यावर आलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत युद्ध घडल्यास व्यापारावर मोठे परिणाम पाहायला मिळतील. भारताचे-इराण व्यापारावर या युद्धाचा परिणाम झाल्यास त्याचा फटका भारतीय बाजाराला बसेल.