टीम हॅलो महाराष्ट्र । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या दिवशी शनिवार असला तरी मुंबई शेअर बाजार नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहे. राष्ट्रीय सुट्ट्या वगळता सोमवार ते शुक्रवार मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज चालते. मात्र, अर्थसंकल्प सादर होत असल्याने इतिहासात पहिल्यांदाच शेअर बाजार शनिवारी सुरु राहणार आहे. यासंदर्भात मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) पत्रक जारी केले आहे. २०१५ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी २८ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र २८ फेब्रुवारी रोजी शनिवार असल्याने शेअर बाजार बंद होता. मात्र,यावेळी नियमात बदल केल्याने शनिवार जरी असला तरी बाजार सुरु रहाणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पचे पडसाद शेअर बाजारावर पडत असतात.बजेटच्या आठवडाभरपूर्वी गुंतवणूकदारांमध्ये सरकारच्या घोषणांची उत्सुकता असते. मागील दशकभरात ‘बजेटच्या’ दिवशी शेअर निर्देशांकावर परिणाम दिसून आला आहे. गेल्या वर्षी ५ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला होता. या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ०.९८ टक्क्यांनी घसरला होता. येत्या १ फेब्रुवारी रोजी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल. त्या दिवशी मुंबई शेअर बाजार नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
असा असायचा स्वातंत्र्यपूर्व भारताचा अर्थसंकल्प!
मोठी बातमी: CAA ला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; केंद्र सरकारला नोटीस