रंग यावा म्हणून येवले चहात केली जाते भेसळ, आणखी कोणत्या त्रुटींमुळे एफडीएने येवलेंना फटकारले?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | काही महिन्यांपूर्वी पुणेस्थित ‘येवले चहा’ या प्रसिद्ध चहा व्यावसायिकांवर मेलामाईट पदार्थाची भेसळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. अन्न आणि औषध प्रशासनाने यासंदर्भात कार्यवाही केली असता त्यांना या प्रकारचा कोणताच खात्रीशीर पुरावा मिळाला नाही. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणं आमच्या नैतिकतेत बसत नाही, असा खुलासाही त्यावेळी नवनाथ येवले यांनी आपल्या दुकानातर्फे दिला होता.

मात्र तरीही काही बाबतीत येवले चहाचे दावे खोटे असल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने त्यांना फटकारलं आहे. येवले चहामध्ये रंग येण्यासाठी विशिष्ट पदार्थ वापरला जात असल्याची माहिती तपासणीअंती समोर आली आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चं यामुळे उल्लंघन होत असल्याचं एफडीए ने म्हटलं आहे.

येवले चहाच्या कोणत्याही दुकानात गेलो तर त्याठिकाणी लावलेल्या माहितीपत्रकात खालील माहिती वाचायला मिळते.

१. चहा बनवण्यासाठी मिनरल वॉटरचा वापर केला जातो.
२. हा चहा पिल्याने पित्त होत नाही.

हे दावे खरं नसल्याचंही एफ.डी.ए ने म्हटलं आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पॅकबंद मालावर माहिती नसणे या बाबतींत येवलेंना फटकारण्यात आलं आहे. आता यावर येवले परिवाराकडून काय उत्तर येतं हे लवकरच समोर येईल.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2020 रोजी सादर करणार अर्थसंकल्प

”शिवसैनिकांनो मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ”

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या एका मेसेजवर त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन – धनंजय मुंडे

 

Leave a Comment