Financial Planning For Children | मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘या’ 5 टिप्स नक्की फॉलो करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Financial Planning For Children घरात लहान बाळ आल्यावर आपण नेहमीच त्याच्या भविष्याची काळजी करत असतो. त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी लागणारी कपडे, त्याच्या आरोग्याची काळजी आपण घेत असतो. या गोष्टी सोबतच आपण मुलांच्या आर्थिक भविष्याकडे तितकेच लक्ष दिले पाहिजे. त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित राहील यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मुलांसाठी चांगली आर्थिक बचत करू (Financial Planning For Children) शकता.

मुलांचे शिक्षणासाठी पैशाची योजना करा

कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची पहिली पायरी असते ती म्हणजे शिक्षण. मुलांनी जर चांगले शिक्षण घेतले, तर त्यांचे भविष्य चांगले होऊ शकते. त्यामुळे मुलांच्या जन्मापासूनच त्यांच्या शिक्षणासाठी थोडी थोडी बचत करून ठेवा. जेणेकरून त्यांना चांगले शिक्षण घेता येईल.

सुकन्या समृद्धी खाते उघडा

तुम्हाला जर मुलगी असेल तर तिच्यासाठी सुकन्या समृद्धी खाते उघडणे उत्तम पर्याय आहे. या योजनेत 8.2% दराने व्याज मिळते. या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली, तर तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी तुम्ही पैसे वाचवू शकता.

जीवन विमा खरेदी करणे | Financial Planning For Children

भविष्यात तुमच्यासोबत कुठलीही अनुचित घटना घडली, तरी तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणे ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही जीवन विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. ही पॉलिसी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी कवरेज प्रदान करते.

इच्छापत्रात मुलांना हक्क द्या

आजकाल इच्छापत्र बनवणे खूप गरजेचे आहे. तुमच्यासोबत जर कुठली अनुचित घटना घडली, तर त्यानंतर तुमच्या मालमत्तेचे वाटप कसे करायचे? हे तुम्ही ठरवू शकता. यासाठी तुम्ही पालक म्हणून तुमच्या इच्छापत्र आणि मृत्युपत्र बनवून त्यात मुलांना हक्क देणे खूप गरजेचे आहे.

मुलांना बचतीचे महत्त्व सांगा

आपण मुलांसाठी सगळ्या आर्थिक गोष्टी केल्या, तरी मुलांना देखील आर्थिकदृष्ट्या साक्षर करणे, ही तुमची जबाबदारी आहे. जबाबदारीने खर्च कसा करायचा हे देखील त्यांना शिकवले पाहिजे. मुलाला आर्थिक दृष्ट्या जबाबदार बनवणे. आणि त्यांचे भविष्य चांगले करणे ही देखील तुमची जबाबदारी आहे.