Financial Year | आर्थिक वर्ष डिसेंबरमध्ये न संपता मार्चमध्ये का संपते? जाणून घ्या मोठे कारण

Financial Year
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Financial Year | आर्थिक वर्ष 2023- 24 संपण्यास अगदी काहीच दिवस उरलेले आहेत. 31 मार्च रोजी हे वर्ष संपेल आणि 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. त्यामुळे सध्या सरकारी कार्यालय, बँका, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सगळे त्यांची काम करून घेण्यासाठी धावपळ करत आहे कर नियोजन, करभरणा तसेच महत्त्वाच्या योजना यांसारखी आर्थिक कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करतात. जेणेकरून 1 एप्रिलपासून सगळे नवीन आर्थिक धोरणे चालू होतील आणि त्यानुसार काम करता येईल. परंतु तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? की वर्षाचा शेवटचा महिना तर डिसेंबर असतो, परंतु आर्थिक वर्ष मार्चला का संपते? तर आज आपण आर्थिक वर्ष (Financial Year) मार्च ते एप्रिल यादरम्यान का असते? याची सगळी कारण जाणून घेणार आहोत.

आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू होण्याची कारणे | Financial Year

आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्याचा नियम हा ब्रिटिश काळात लागू झाला होता. कारण हा नियम ब्रिटिशांसाठी सोयीचा होता. त्यामुळे त्यांनी आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू केले. भारत स्वातंत्र्य झाला असला, तरी त्यांना या आर्थिक चक्रात कोणताही बदल करता आला नाही. त्यामुळे आर्थिक वर्षाचा कालावधी मार्च ते एप्रिल असाच ठेवण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. 31 मार्चपर्यंत अनेक पिके शेतकऱ्यांच्या हातात येतात. यावेळी शेतकरी त्यांच्या जमिनीची मशागत करतो, पिकाची कापणी करतो. धान्य बाजारात नेऊन विकतो. त्यातून त्यांना काही रक्कम मिळते. ती रक्कम त्यांच्यासाठी वर्षभर पुरेल एवढी असते. म्हणून नवीन आर्थिक वर्षाची (Financial Year) सुरुवात ही 1 एप्रिल पासून केली जाते.

ही सगळी कारणं असली तरी अनेकांना प्रश्न पडला असेल की, पण डिसेंबर महिन्यात आर्थिक वर्ष संपवण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे ? तर भारतामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत विविध सण आणि उत्सव असतात. यावेळी प्रत्येकाचे आर्थिक वेळापत्रक वेगळे असते. सगळीकडे खरेदीची गडबड असते आणि संपूर्ण परिस्थिती देखील खूप आनंदाची आणि गडबडीची असते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात आर्थिक वर्ष संपवणे शक्य होत नाही.

तज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांचे असे मत आहे की, 1 एप्रिलपासून हिंदू नवीन वर्ष सुरुवात होते. यावेळी गुढीपाडवा सुरू होतो. आणि मराठी लोकांचे नवीन वर्ष सुरू होते. म्हणून राज्यघटनेमध्ये एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष ठेवण्यात आलेले आहे.