रेल्वेमध्ये देणाऱ्या येणाऱ्या किटची खासियत आणि किंमत काय आहे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । थंडी वाढल्याने रेल्वेने प्रवास करणे अवघड झाले आहे. कोरोनानंतर ट्रेनमध्ये ब्लँकेट पिलो मिळणे बंद झाले आहे. मात्र, परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्यानंतर आता रेल्वे डिस्पोजेबल बेडरोल किट्स देणार आहे. रेल्वेने अशा किट्सची सुविधाही सुरू केली आहे. यामध्ये दैनंदिन वापरातील अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

डिस्पोजेबल बेड रोल
या विशेष सेवेअंतर्गत प्रवाशांना डिस्पोजेबल बेडरोल मिळेल. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना ही सुविधा दिली जात आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही सुविधा फक्त निवडक गाड्यांमध्येच उपलब्ध असेल. यामध्ये मुंबई-दिल्ली राजधानी एक्सप्रेस, मुंबई-दिल्ली ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस, गोल्डन टेंपल मेल आणि पश्चिम एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

किंमत किती आहे ?
रेल्वेच्या या खास सुविधेसाठी प्रवाशांना 150 रुपये मोजावे लागणार आहेत. या किटमध्ये अनेक गोष्टी मिळतील. यामध्ये ब्लँकेटसोबत टूथ पेस्ट आणि मास्क यांसारख्या वस्तूही मिळतील. या रेल्वे किटमध्ये आणखी काय काय आहे ते जाणून घेऊयात.

Specifications:
MRP. ₹ 150.00
1- Bed Sheet White(20 GSM)
48 x 75
(1220mm x 1905mm)

2- Blanket Grey/Blue(40 GSM)
54 x 78
(1370mm x 1980mm)

3- Inflatable Air Pillow White
12 x 18

4- Pillow Cover WHITE

5- Face Towel/Napkin WHITE

6- Three ply Face Mask

डिस्पोजेबल बेडरोल किट्स
रेल्वेच्या वेगवेगळ्या झोनमध्ये डिस्पोजेबल बेडरोल किट आणि त्यात मिळणाऱ्या साहित्याची किंमत वेगवेगळी आहे. कुठे किटमध्ये टूथपेस्ट आणि सॅनिटायझर दिले जात आहे तर कुठे फक्त ब्लँकेट, उशा आणि चादरी दिल्या जात आहेत.

ट्रेनमध्ये तीन प्रकारचे डिस्पोजेबल बेडरोल किट उपलब्ध असतील. एका किटमध्ये न विणलेली ब्लँकेट, न विणलेली बेडशीट, न विणलेली उशी आणि त्याचे कव्हर, डिस्पोजेबल बॅग, टूथपेस्ट, टूथब्रश, केसांचे तेल, कंगवा, सॅनिटायझर पाउच, पेपर्सॉप आणि टिश्यू पेपर असेल. या किटची किंमत 300 रुपये ठेवण्यात आली आहे.

एका किटमध्ये फक्त ब्लँकेटच उपलब्ध असेल. त्याची किंमत 150 रुपये आहे आणि तिसऱ्या किटची किंमत फक्त 30 रुपये आहे. या किटमध्ये टूथपेस्ट, टूथब्रश, केसांचे तेल, कंगवा, सॅनिटायझर पाऊच, पेपर सोप आणि टिश्यू पेपर उपलब्ध असतील.

ट्रेनमध्ये किट कोण देईल ?
पश्चिम रेल्वेने गाड्यांमधील बेडरोल किट विकण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, खाजगी कंत्राटदारांनी तैनात केलेले किमान दोन लोकं ट्रेनमध्ये चढतील आणि ते डिस्पोजेबल बेडरोल विकतील. हे कामगार 150 रुपये प्रति पॅकेट दराने प्रवाशांना विकतील.

Leave a Comment