लग्नाच्या मंडपात नवरीचे फोटो काढतो म्हणून नवऱ्याने मारले ‘या’ तुफान व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवरीचे जास्त फोटो काढतो म्हणून नवऱ्याने फोटोग्राफरला तापली मारली. आणि त्यानंतर नवरी खूप लोटपोट होऊन हसत आहे. असा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता. यामागील सत्य समोर आले असून नवीन माहिती आता पुढे आली आहे. जाणून घेऊ या व्हिडिओमागे काय सत्य कहाणी आहे याबाबत.

नवरीचे आणि नवऱ्याचे फोटो शूट करत असताना कॅमेरामॅन नवरीचे फोटो काढण्यास इतका गुंग होतो की, नवऱ्याकडे पाहतही नाही. त्यामुळे बाजूला उभा असलेला नवरा फोटोग्राफरच्या डोक्यामध्ये एक जोरात तापली मरतो. यामुळे नवरीला मोठ्या प्रमाणात हसू येते. ती स्टेजवर बसून हसायला लागते. यामुळे पाहुणेमंडळीमध्येही एकच हशा पिकतो. असा व्हिडीओ समोर आला होता. आणि त्यावर प्रचंड प्रमाणात कमेंट होत होत्या. रेणुका मोहन नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ सर्वप्रथम इंटरनेटवर टाकला होता.

https://twitter.com/Ease2Ease/status/1357675009905291264?s=19

हा व्हिडिओ इंटरनेटवर टाकल्यानंतर रेणुका मोहन यांच्या ट्विटर व्हिडिओवरती मोठ्या प्रमाणात कमेंट येत होत्या. त्यावर अनिक्रिती चौहान नावाच्या तरुणीने कमेंट करून सांगितले की, ‘हा व्हिडिओ त्यांच्या चित्रपटातील एक दृश्य असून चित्रकरना दरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले. आणि अनिक्रीती यांनी स्वतःच्या इंस्टाग्रामवरतीही हा व्हिडिओ शेअर केला असून ‘डार्लिंग प्यार झुकता नही’ या चित्रपटातला व्हिडिओ असल्याचे सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment