‘आता Bitcoin घेणार डॉलरची जागा’, जॅक डोर्सी असे का म्हणाले जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ट्विटरचे माजी CEO आणि सह-संस्थापक असलेल्या जॅक डोर्सी यांनी ट्विट केले आहे की,’बिटकॉइन भविष्यात यूएस डॉलरची जागा घेईल.’ हे ट्विट ग्रॅमी पुरस्कार विजेते रॅपर Cardi B यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केले आहे. Cardi B ने विचारले की,” क्रिप्टोमुळे डॉलर बदलणार आहे असे तुम्हाला वाटते का? याच्या प्रत्युत्तरात, जॅक डोर्सी म्हणाले, “नक्कीच, Bitcoin त्याची जागा घेईल.”

या ट्विटनंतर, CoinDesk वर Bitcoin आणि Ether च्या किंमतीत 5.6 टक्के वाढ नोंदवली गेली. आज सकाळी बिटकॉइन 48,525 डॉलर्स तर इथेरियम 3,988 डॉलर्सवर ट्रेड करत होते.

कार्डी बी आणि जॅक डोर्सी यांच्यात डॉलरऐवजी क्रिप्टोकरन्सीबद्दलच्या ट्विटर संभाषणावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. Dogecoin सह-संस्थापक Billy Markus यांनी Dogecoin यूएस डॉलरपेक्षा जास्त स्थिर कसा आहे याबद्दल एक मिम पोस्ट केले, तर बिटकॉइन इन्व्हेस्टर असलेले Dennis Porter म्हणाले की,” हे संभाषण खरोखरच असे होते, जे टाळता येत नाही.”

बिटकॉइन जगाला एकत्र करेल
डिजिटल पेमेंट्स कंपनी Square चे CEO असलेले Dorsey 2018 पासून बिटकॉइनचे सुपरफॅन आहेत. Square ने अलीकडेच त्याचे कॉर्पोरेट नाव बदलून ब्लॉक असे केले आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये, डोर्सीने ट्विट केले, “#Bitcoin मोठ्या प्रमाणावर विभाजित राष्ट्रांना (आणि शेवटी जग) एकत्र करेल”.

पराग अग्रवाल यांनी डोर्सीची जागा घेतली
माजी ट्विटर बॉस नोव्हेंबरमध्ये सीईओ पदावरून पायउतार झाले आणि आता त्यांची जागा चीफ टेक्निकल ऑफिसर पराग अग्रवाल यांनी घेतली. ट्विटरवरील त्यांच्या कार्यकाळात, जॅक डोर्सीने प्लॅटफॉर्मवर बिटकॉइन टिपिंग सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि NFT ऑथेंटिकेशन जोडण्याचे वचन दिले. सध्याचे CEO, अग्रवाल, मुख्यत्वे Twitter मधील डिसेंट्रलाइज्ड प्रोजेक्ट्सशी संबंधित आहेत.

डॉर्सी बिटकॉइनशी संबंधित अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे
ऑक्टोबरमध्ये, डॉर्सी म्हणाले की,” ब्लॉक वैयक्तिक आणि व्यवसायांसाठी कस्टम सिलिकॉन आणि ओपन-सोर्स बिटकॉइन मायनिंग सिस्टीम विकसित करण्यावर काम करेल. ब्लॉकमध्ये बिटकॉइनवर केंद्रित अनेक प्रोजेक्ट्स आहेत.”

डोर्सी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आम्ही असे केल्यास, आम्ही आमचे हार्डवेअर वॉलेट मॉडेल फॉलो करू, जे कम्युनिटीसह एकत्रितपणे विकसित करण्याबद्दल आहे.” दरम्यान, कार्डी बी आणि डोर्सी यांच्यातील ट्विटबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Leave a Comment