Wednesday, June 7, 2023

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात FIR दाखल; PM Care बाबत चुकिची माहिती दिल्याचा आरोप 

वृत्तसंस्था । कॉग्रेस आणि भाजपा यांच्यातील राजकीय तणाव हे भारतासाठी काही नवीन नाहीत. हे दोन्ही पक्ष सतत एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. सोशल मीडियावर गेले अनेक दिवस कोरोना संक्रमणाच्या काळातही दोन्ही पक्षाचे एकमेकांवर ताशेरे ओढण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने पीएम केअर फंडाची सर्व माहिती ऑनलाईन शेअर करण्यास सांगितले होते. कर्नाटकातील शिमोगा येथील एका वकिलांनी या विरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर एफआयआर दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष चुकीची माहिती पसरवत असल्याची तसेच पीएम केअर फंडाच्या बाबतील काँग्रेस पक्ष घेत असल्याच्या भूमिकेबद्दल तक्रार केली आहे.

११ मे रोजी काँग्रेस ने पीएम केअर फंडाबाबत ट्विट केले होते. या ट्विट द्वारे त्यांनी केंद्र सरकार वर चुकीचे आरोप केले असल्याचे या वकिलांचे म्हणणे आहे. काँग्रेस ने भाजपा ला पीएम केअर फंडाच्या तपशीलाची मागणी केली होती. तसेच ज्या राज्यांमध्ये काँग्रेस चे सरकार आहे अशा राज्यांमध्ये भाजपा भेदभाव करत असल्याचे आरोप काँग्रेस ने केले आहेत. हा मुद्दा अनेकदा काँग्रेस ने धरून ठेवला आहे. भारतीय दंड कलम १५३ आणि ५०५ द्वारे भाजपा वर चुकीचे आरोप करण्याची एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर ही एफआयआर दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील मंत्र्यांची बैठक होऊनही केंद्र सरकार सहकार्य करत नसल्याचा मुद्दा काँग्रेस कडून उठवला गेला होता. भाजपा च्या अनेक निर्णयाविरुद्ध सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. कोरोना संकटकाळातही आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.