संभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । देश कोरोनासारख्या संकटाशी झुंज देत आहे. त्यामुळे सर्वत्र संचारबंदीच्या नियमांचे पाल केले जात आहे. संक्रमण साखळी तोडून लवकरात लवकर सामान्य माणसाला त्यांचं दैनंदिन जीवन जगता यावं म्हणून सरकार काटेकोरपणे काही गोष्टी पाळत आहे. मात्र शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे यांनी या संचारबंदीचे उल्लंघन केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातून बाहेर जात असताना परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असतानाही परवानगी न घेता सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भिडे यांनी प्रवास केला आहे. त्यांच्यावर या कारणांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या वक्तव्यामुळे बऱ्याचदा अडचणीत आले आहेत. माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलं होतात, देशाने जगाला बुद्ध दिला पण बुद्ध काहीच उपयोगाचा नाही, मनु हा संत तुकारामापेक्षाही श्रेष्ठ होता अशा त्यांच्या वक्तव्यामुळे ते बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये ते गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करायचे पण तिथे मतभेद झाल्यावर संघाशीच अनुरूप असणारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. मिरज दंगलीमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. संभाजी महाराज बलिदान मास, दुर्गामाता दौड हे उपक्रम त्यांनीच सुरु केले आहेत.

परवानगीशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास केला म्हणून भारतीय दंड कलम १८८ अन्वये त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांगलीतून कोल्हापूरला परवानगीशिवाय गेले. त्यांनी परवानगी न घेता प्रवास केल्याबाबद्दल त्यांच्यावर कोल्हापूरच्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत. आपल्या वादातीत विधानांमुळे ते कायम वादात आणि चर्चेत अडकलेले असतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment