हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग लागल्याची माहिती समोर येत असून गव्हर्नर सूट मध्ये ही लागली आग. आगीमुळे सगळीकडे धुराचे साम्राज्य पसरले असून अधिकाऱ्यांची पळापळ सुरु झाली आहे . सकाळी ८ वाजून ४० मिनिटाच्या दरम्यान हि आग लागली आहे असं समजत आहे. आग वीजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून सध्या आग आटोक्यात आली आहे अशी माहिती समोर येत आहे
आगीची माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि अग्निशमक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अल्पावधितच आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. वित्त हानी नेमकी किती झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही.
राज्यपालांच्या खोलीच्या आसपासच्या खोल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. फर्निचरचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यपालांच्या खोलीतील सर्व सामान बाहेर काढण्यात आलं आहे. आज विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.