भायखळ्यात 52 मजली सॅलसेट टॉवरला भीषण आग; परिसरात खळबळ

0
30
Byculla
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दक्षिण मुंबईतील (South Mumbai) भायखळा परिसरात (Byculla Area) असलेल्या सॅलसेट २७ या उच्चभ्रू ट्विन टॉवरमधील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. ही आग ५२ मजली या इमारतीच्या ४५ व्या मजल्यावर लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले.

आग लागल्याने परिसरात खळबळ

ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे भायखळा आणि परळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तसेच, भायखळा-परळ पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

महत्वाचे म्हणजे, सॅलसेट २७ हा भायखळ्यातील सर्वांत महागड्या निवासी प्रकल्पांपैकी एक मानला जातो. यात प्रत्येकी ५२ मजली असे दोन टॉवर असून, श्रीमंत नागरिक येथे वास्तव्य करतात. ४५ व्या मजल्यावर लागलेल्या आगीने इतर मजल्यांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.

प्रशासनाकडून मदतकार्य सुरू

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या बरोबरच मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलीस दलही दाखल झाले आहे. यासह आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष शिड्या आणि पाण्याच्या बंबांचा वापर करण्यात येत आहे. तसेच, इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कामही सुरू आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.