पुण्यातील कॅम्प परिसरात भीषण आग ; फॅशन स्ट्रीट उध्वस्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल 800 दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली आहे. तसेच या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आग मोठी असल्यानं अग्निशमन दलाचे आणखी बंब घटनास्थळी बोलावण्यात आले आहेत. रस्ते अतिशय अरुंद असल्यानं आगीपर्यंत पोहोचणं अवघड जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुकानं असल्यामुळे व्यापारीवर्ग आणि आजूबाजूला राहणाऱ्या बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली आहे.

फॅशन स्ट्रीटच्या सभोवताली, मोती बिल्डिंग, एम जी रोडवरील घरं, शहजहानंद अपार्टमेंट, समृद्दी अपार्टमेंट येथे मोठी लोकवस्ती आहे. त्यांनादेखील मोठ्या प्रमाणात आगीच्या झळा बसल्या आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group