जगात पहिल्यांदाच दिली जाणार 12 वर्षापर्यंतच्या मुलांना करोना लस; ‘या’ देशाने सुरु केले या वयोगटाचे लसीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅनडाने बुधवारी 12 वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरणासाठी फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजूरी दिली आहे. असे करणारा कॅनडा पहिला देश बनला आहे. बर्‍याच देशांमध्ये प्रौढांना सध्या कोरोनाची लस दिली जात आहे, काही देशांमध्ये लसीचे किमान वय 16 वर्षांपर्यंत आहे. या वयोगटातील मुलांना कोरोना लस दिली जात नाही. भारतातही कमीत कमी वय हे १८ वर्ष आहे. यामुळे कॅनडाच्या या निर्णयाचे जगभरातून स्वागत केले जात आहे.

कॅनडाच्या मुख्य वैद्यकीय सल्लागार सुप्रिया शर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “कॅनडातील ही पहिली लस आहे जीला कोविड -19 पासून मुलांना संरक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि कॅनडाच्या साथीच्या रोगाविरुद्धचा हा मैलाचा दगड आहे. जगात प्रथमच आम्ही 12-15 वर्षांच्या मुलांसाठी फायझर लस मंजूर केली आहे. निर्मात्यांनी सादर केलेल्या चाचणी अहवालाचा आढावा घेतल्यानंतर लवकरच ते यूके आणि युरोपियन युनियनमध्येही मंजूर होऊ शकेल. असे म्हटले जात आहे की पुढील आठवड्यापर्यंत अमेरिका 12-15 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ही लस मंजूर करू शकते. अमेरिकेतील 2000 हून अधिक किशोरांना दोन लसींचे डोस दिले गेले. आणि चाचणीत असे दिसून आले की ते प्रौढांसारखेच सुरक्षित आणि प्रभावी आहेत.

कॅनडाच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की लस घेतलेल्या कोणत्याही मुलास कोरोना संसर्ग झालेला आढळला नाही. प्रौढांमध्ये ही लस संसर्ग रोखण्यासाठी 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. मुलांवर लसीचे दुष्परिणाम हे वयस्क माणसासारखे होते, जसे की हात दुखणे, थंडी वाजून येणे आणि ताप. कॅनडामध्ये फायझरची लस 16 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी डिसेंबरमध्ये मंजूर झाली होती. कॅनडामध्ये अ‍ॅस्ट्रॅजेनेका, जॉनसन आणि जॉनसन आणि मोडर्ना सारख्या लसिंना देखील मान्यता देण्यात आली आहे आणि 6 महिन्यांपर्यंतच्या मुलांसाठी लसीच्या चाचण्या प्रक्रियेत आहेत. हळू हळू पूर्ण जनसंख्या कव्हर केली जाईल.

Leave a Comment