राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे सुरु; पहिल्याच दिवशी ११,४१७ जणांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शुभारंभ करण्यात आला. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली असून केवळ १० रुपयात मिळणाऱ्या शिवथाळीचा राज्यातील ११ हजार ४१७ नागरिकांनी आस्वाद घेतला. याबाबतची माहिती माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यातील गोरगरीब नागरिकांना सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु केल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. शिवभोजन ही राज्य शासनाची प्रमुख योजना असून तिची राज्यात काटेकोर आणि व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण विभागाला सूचना देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री महोदयांच्या हस्ते रविवारी शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, ज्या खानावळ, स्वंयसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट, मेसच्या माध्यमातून शिवभोजन योजना राबविली जात आहे अशा केंद्रांना योजनेची अंमलबजावणी करण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रातून योजनेअंतर्गत दुपारी १२ ते २ यावेळेत जेवण उपलब्ध करून दिले जाते.

राज्यात सुरु झालेली शिवभोजन केंद्रे
अकोला २, अमरावती ३, बुलढाणा ३, वाशिम २, औरंगाबाद ४, बीड १, हिंगोली १, जालना २, लातूर १, नांदेड ४, उस्मानाबाद ३, परभणी २, पालघर ३, रायगड ४, रत्नागिरी ३, सिंधुदूर्ग २, परळ ३, अंधेरी ३, वडाळा २, ठाणे ७, कांदिवली २, भंडारा २, चंद्रपूर ३, गडचिरोली १, गोंदिया २, नागपूर ७, वर्धा २, अहमदनगर ५, धुळे ४, जळगाव ७, नंदूरबार २, नाशिक ४, कोल्हापूर ४, पुणे १०, सांगली ३, सातारा ४, सोलापूर ५.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

हे पण वाचा-

मारहाण आणि खंडणी प्रकरणी उदयनराजे निर्दोष; सातारा सत्र न्यायालयाचा निकाल

उद्धव ठाकरेंवर पंकजा मुंडेंचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाल्या, सरकार संधीच सोनं करेल

राहुल गांधी पुन्हा होणार काँग्रेस अध्यक्ष; रिलॉन्चसाठी काँग्रेसची टीम लागली कामाला