नवी दिल्ली । राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणाने आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आर्थिक सर्व्हे सादर केल्यानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे. त्यामुळे, आता थेट सोमवारी १ फेब्रुवारीला सकाळी 11 वाजताच सभागृहात चर्चेला सुरुवात होईल.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्पापूर्वी लोकसभेत आर्थिक सर्व्हे सादर केला. यानंतर हा आर्थिक सर्व्हे संसदेच्या वरीष्ठ सभागृहातही सादर होईल. मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमण्यम यावर दुपारी ३.३० वाजता एका पत्रकार परिषदेत याची माहिती देतील.
लोकसभा की कार्यवाही सोमवार 11 बजे तक के लिए स्थगित
– लोकसभा में 'आर्थिक सर्वेक्षण 2020-21' पेश #BudgetSession @airnewsalerts @PIBHindi
Watch : https://t.co/BOQkeXWYih pic.twitter.com/yLhscUJ1F8
— डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) January 29, 2021
मात्र, लोकसभेत आर्थिक सर्व्हे सादर करण्यात आल्यानंतर आज संपूर्ण दिवसासाठी सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलंय. त्यानंतर, उद्या आणि परवा सुट्टी असल्यामुळे आता थेट 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजेपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आली आहे दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन हेही कोरोना नियमावलीच्या निर्बंधांतच होत आहे. कोरोना महामारीमुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन झाले नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.