भारतात होणार पहिली Electric Two Wheeler रेसिंग चॅम्पियनशिप; TVS ने केली घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेसिंग म्हणलं की आपल्याला आठवते ती स्पोर्ट्सची रेसिंग टू – व्हीलर बाईक. भारतात आतापरेंत अनेक रेस झाल्या. मात्र टू व्हीलर इलेक्ट्रिक रेसिंग झाली नव्हती. परंतु,आता TVS मोटर कंपनीने भारतातील पहिली इलेक्ट्रिक टू-व्हीलर रेसिंग चॅम्पियनशिप लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशात पहिल्यांदाच टू -व्हीलर इलेक्ट्रिक रेसिंग चॅम्पियनशिप होणार आहे. ह्यामध्ये एकूण 8 रेसर भाग घेणार आहेत. भारतात होणाऱ्या ह्या पहिल्या चॅम्पियनशिपला इलेक्ट्रिक वन मेक चॅम्पियनशिप असे नाव देण्यात आले आहे. ह्या रेसिंगमुळे EV मोटरसायकल रेसिंगच्या जगात प्रवेश करणारी TVS ही पहिली भारतीय उत्पादक कंपनी बनली आहे.

कधी होणार रेसिंग चॅम्पियनशिप-

इलेक्ट्रिक वन मेक चॅम्पियनशिप 29 सप्टेंबर 2023 रोजी सुरु होणार आहे. चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत विशेष निवड झालेल्या 8 रायडर्सचा समावेश असेल. हे रायडर्स TVS Apache RTE मोटरसायकलवर शर्यत करतील. ज्या या चॅम्पियनशिपसाठी खास बनवण्यात आल्या आहेत. ह्यामुळे tvs कडून एक नवा विक्रम रचला जाईल अशी अशा व्यक्त केली जात आहे.

काय आहे गाड्यांची खासियत

TVS या गाड्यांमध्ये हाय पॉवर बॅटरी सेलचा वापर करते. या स्पोर्ट बाईक मध्ये लिक्विड-कूल्ड मोटर आणि हाय-परफॉर्मन्स लिक्विड-कूल्ड मोटर कंट्रोल असेल. यासह, ते त्याच्या श्रेणीतील वजनानुसार हाय पॉवर परफॉर्मन्स देण्यास सक्षमही आहे. तयार केलेल्या बॅटरी केस कार्बन फायबरपासून बनलेल्या आहेत. टू व्हीलरच्या मागील बाजूस ओहलिन्स सस्पेंशन आहे. ब्रेकिंगबद्दल बोलायचे झाल्यास, यात 320mm डिस्क आणि मागील बाजूस एक डिस्क देखील आहे. कॅलिपर आणि मास्टर सिलिंडर ब्रेम्बोमधून मिळतात. TVS पिरेलीचे सुपर कोर्सा टायर वापरत आहे. वजन हलके ठेवण्यासाठी कार्बन फायबरपासून फेअरिंग देखील बनवले जाते.