आधी फ्रेंड रिक्वेस्ट, मग अश्लील चॅटिंग; अखेर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून अनोळखी महिलेला अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या इसमाला औरंगाबादेतील पुंडलिक नगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आधी या इसमाने महिलेला चांगले मित्र बनू असे म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मात्र तिने या मैत्रीला नकार दिल्यानंतर त्याने वारंवार अश्लील व्हिडिओ आणि चॅटिंग सुरु केली. या प्रकरणी संबंधित महिलेने पोलिसात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत संबंधित इसमाच्या मुसक्या आवळल्या. महिलेला त्रास देणाऱ्या व्यक्तीचे नाव शहबाज अन्सारी वाहेद अन्सारी (30, रा. शबाना हॉस्पिटलसमोर शहाबाजार) असे आहे.

अनेक वेळा केले व्हिडिओ कॉल
संबंधित प्रकरणात 35 वर्षीय महिलेने पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. 29 ऑगस्ट रोजी फेसबुक मॅसेंजरवर अनोळखी व्यक्तीने तिला मॅसेज टाकला होता. आपण चांगले मित्र बनूत, अशी विनंती त्यात करण्यात आली होती. मात्र फिर्यादीने त्याला उत्तर दिले नाही. त्यानंतर आरोपीने 30 ऑगस्ट ते 19 सप्टेंबरपर्यंत फिर्यादीच्या मॅसेंजरवर अश्लील मॅसेज करण्यास सुरुवात केली. तसेच तो अनेक अश्लील व्हिडिओ देखील टाकू लागला. संबंधित महिलेला या इसमाने अनेकदा व्हिडिओ कॉल करून मानसिक त्रास देण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाईल हॅक झाला म्हणे –
पुंडलिक पोलिसांनी तपास केल्यानंतर संबंधित इसम हा ऑनलाइन आधारकार्ड करून देण्याचा व्यवसाय करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यानंतर त्याची चौकशी केली. तेव्हा माझा मोबाइल कुणीतरी हॅक केलाय, अशी थापही या इसमाने मारली. पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त करून तपासला असता, आरोपीनेच फिर्यादीला अश्लील व्हिडिओ टाकल्याचे स्पष्ट झाले. महिलेला त्रास देणाऱ्या व्यक्तीचे नाव शहबाज अन्सारी वाहेद अन्सारी (30, रा. शबाना हॉस्पिटलसमोर, शहाबाजार) असे आहे. आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी सोमवारी 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Leave a Comment