Monday, January 30, 2023

धक्कादायक ! आधी पत्नी-मुलीला संपवले त्यानंतर घरी आलेल्या शिक्षिकेला…

- Advertisement -

रांची : वृत्तसंस्था – झारखंडच्या जमशेदपूर भागातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दीपक नावाच्या व्यक्तीने एक धक्कादायक कृत्य केले आहे. यामध्ये दिपकने स्वत: च्या पत्नीची आणि लेकीची हत्या केली. त्यानंतर त्याने घरी आलेल्या शिक्षिकेलासुद्धा दिपकने मारून टाकले. एवढ्यावरच न थांबता दिपकने शिक्षिकेच्या मृतदेहासोबत संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दीपक टाटा स्टीलच्या फायर ब्रिगेड विभागात काम करत होता. दिपकला ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात त्याच्या पार्टनरने फसवणूक केली होती. त्यामुळे दीपक कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला होता. यामुळे त्याने मित्राची हत्या करण्याचा विचार केला. पण आपण असे केल्यानंतर आपण तुरुंगात जाऊ त्यानंतर आपला परिवार रस्त्यावर येईल. यामुळे त्याने सगळ्यात आधी आपल्या परिवाराला संपवले. त्यानंतर घरी आलेल्या ट्यूशन टीचरलादेखील दिपकने संपवले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी दिपकचा मित्र व त्याचा मेहुणा घरी आला तेव्हा दिपकने त्यांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही जीव वाचवून दिपकच्या तावडीतून सुटले. यानंतर पोलिसांनी दिपकला अटक केली. दिपकच्या या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी हा सायको किलर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.