२० जुलैला वंचित बहुजन आघाडीची विधानसभेची पहिली यादी जाहीर करणार : प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | आम्ही वंचित आघाडीला अधिक सक्षम करण्यासाठी मित्र पक्ष शोधत आहोत. काही लोकांशी आमची बोलणी सुरू आहेत. ते लोक सोबत आले तर ठीक अन्यथा आम्ही २८८ जागा लढण्यासाठी सक्षम आहोत असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी यांनी व्यक्त केले आहे. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

तसेच येत्या २० जुलै पर्यंत आम्ही वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी आणि जाहीरनामा प्रकाशित करणार आहे असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे. वंचित बहुजन आघाडीला नेहमीच नामोहरण करण्याचा प्रयत्न काँग्रेस आघाडीकडून केला जातो. ते आम्हाला भाजपची बी टीम म्हणतात. त्यांनी या आरोपाचे पुरावे द्यावेत आणि नंतर हे आरोप करावेत असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे.

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची रणनीती काय असणार हे ठरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची बैठक मुंबईत पार पडली यात प्रकाश आंबेडकर यांच्यावरील भार हलका करण्यासाठी तीन उपनेत्यांची निवड करण्यात आली आहे. शंकरराव लिंगे, धनराज वंजारी, अ‍ॅड विजय मोरे या तीन नेत्यांची वंचितच्या उपनेते पदी निवड करण्यात आली आहे. तर सांगली लोकसभा मतदारसंघात निर्णायक मते घेणारे गोपीचंद पडळकर आता वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस असणार आहेत.

Leave a Comment