ठरलं ! नवी मुंबई विमानतळावर ‘या’ दिवशी होणार विमानाची पहिली टेस्टिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबईकरांसाठी एक मोठी खुशखबर आहे. लवकरच नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे सुरु होण्याची शक्यता आहे. याबाबतची मोठी अपडेट आता हाती आली असून येत्या 5 ऑक्टोंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या धावपट्टीवर विमानाची पहिली लँडिंग टेस्ट होणार आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती एका मराठी माध्यमाला शिवसेना शिंदे गटाचे नेते अन् सिडकोचे चेअरमन आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.

सध्याचा विचार करता नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरु आहे या विमानतळाची पाहणी आमदार संजय शिरसाट यांनी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले,5 तारखेपर्यंत एअरफोर्सचे एक विमान रन वे वर ट्रायल करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करायचा आहे. या विमानतळावर 4 टर्मिनल आहे. त्या ठिकाणी जवळपास 350 विमाने एकाच वेळी पार्क करू शकतो. शिवाय विमानतळाच्या कामावर सुद्धा त्यांनी समाधान व्यक्त केले.

नवी मुंबई विमानतळावर विविध कनेक्टिव्हिटी असणार आहे. मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असणार आहे. एक्सप्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्याचा फायदा ठाणे, कल्याण, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. हे विमानतळ एक माईल्डस्टोन असणार आहे. या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील भारही कमी होणार आहे. दरम्यान 19 हजार 600 कोटी रुपये खर्च करुन हे विमानतळ उभारण्यात येत आहे. हा ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्रॉजेक्ट 5 टप्प्यात पूर्ण होणार आहे. सिडकोचे निर्देशक विजय सिंघल आणि संयुक्त प्रबंध निदेशक शांतनु गोयल या ठिकाणी सुरु असलेल्या कामांवर लक्ष ठेवत आहेत.