आधी युतीचा धर्म, नंतर मैत्री – चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर येथील मुरगूड येथे शिवसेना -भाजप मेळावा झाला. या मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत असताना म्हणाले की,माझ्या पत्नीने उद्या राष्ट्रवादी कडून लोकसभा निवडणूक लढण्याची मागणी केली तरी मी शिवसेनेच्या उमेदवाराचाच प्रचार कारेन.

शिवसेनेचे संजय मंडलिक हे कोल्हापूर येथून आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहेत. शिवसेना- भाजप युती झाल्यामुळे कोल्हापूर मतदारसंघ शिवसेना लढवणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि चंद्रकांत पाटील यांची मैत्री असल्यामुळे पाटील हे शिवसेनेचा प्रचार करतात का राष्ट्रवादीचा याबाबत कार्यकर्ते संभ्रमात होते.

युतीचा धर्म पाळणे महत्वाचे, मैत्री नंतर बघू त्यामुळे मी आधी युतीचा धर्म पाळेन, महाडिक यांची मैत्री आत्तातरी बाजूला ठेवेनअसे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे केले. शिवसेनेचे संजय मंडलिक यांना विजयी करून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
इतर महत्वाचे-

जगातील सर्वात प्रदूषित शहरे भारतात

नाशिकमध्ये उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब नाहीच…

चहाची उधाारी थकल्याने सीएचे कार्यालय फोडले; आरोपीकडुन पावणे दोन लाख हस्तगत

Leave a Comment