देशात धावणार पहिली हायड्रोजन ट्रेन; रेल्वे विभागाची जय्यत तयारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात रेल्वेचं भलंमोठं जाळं आहे. लांबच्या आणि आरामदायी प्रवासासाठी अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात. रेल्वे विभागाने सुद्धा मागील काही वर्षात रेल्वेचा कायापालट केला आहे. देशात दरवर्षी नवनवीन आणि अपडेटेड ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येतायत. यापूर्वी आपण वंदे भारत ट्रेन, अमृत भारत एक्सप्रेस, वंदे भारत साधारण अशा नवनवीन ट्रेन बघितल्या असतील… मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुद्धा जोरात सुरु आहे. त्यातच आता . भारतीय रेल्वेने देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची योजना आखली आहे. हि ट्रेन स्वच्छ आणि पर्यावरणपूरक असणार आहे. हायड्रोजन ट्रेनचे जुन्या इंधनाच्या तुलनेत कमी प्रदूषण होणार असून, भारतीय रेल्वेने अधिक टिकाऊ ट्रान्सपोर्ट सिस्टम विकसित करण्याच्या दिशेने उचलले महत्वपूर्ण पाऊल आहे. या ट्रेनच्या माध्यमातून 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट आहे. या ट्रेन देशाच्या विविध ऐतिहासिक आणि टेकडी मार्गांवरून धावणार आहेत.

जर्मनच्या TUV-SUD संस्थेशी करार –

या ट्रेनसाठी भारतीय रेल्वेने जर्मनीच्या TUV-SUD या संस्थेसोबत सुरक्षा ऑडिटसाठी करार केला आहे. TUV-SUD हे विविध उद्योगांसाठी उत्पादनांची चाचणी करणे , प्रमाणपत्र तसेच सल्ला देण्याचे काम करते . या कंपनीचा उद्देश ग्राहकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि टिकाऊ उत्पादने व सेवा उपलब्ध करून देणे हा असतो . या पुनरुत्पादन हायड्रोजन ट्रेनची चाचणी 2024 मध्ये सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर सिस्टम इंटिग्रेशन युनिट बॅटरी आणि दोन फ्युएल युनिट सिंक्रोनायजेशन याची सुद्धा यशस्वी चाचणी झाली आहे. यामध्ये विद्यमान डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (DEMU) रेकमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल बसवण्याचा प्रकल्प आणि आवश्यक पायाभूत सुविधा देण्याचे काम चालू आहे.

35 हायड्रोजन ट्रेनची तयारी –

या प्रकल्पामध्ये पाच हायड्रोजन फ्यूल सेल आधारित मेन्टेनन्स वाहने तयार केली जाणार आहेत. ज्यामध्ये प्रत्येक वाहनाचा खर्च 10 कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. हायड्रोजन फॉर हेरिटेजच्या माध्यमातून देशाच्या विविध ऐतिहासिक आणि टेकडी मार्गांवर 35 हायड्रोजन ट्रेन तयार केल्या जाणार आहेत. या प्रत्येक ट्रेनमागे अंदाजे 80 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मार्गासाठी जमिनीवरील पायाभूत सुविधांसाठी 70 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी उत्तर रेल्वेच्या दिल्ली डिव्हिजनमध्ये पहिली हायड्रोजन ट्रेनची नियुक्ती करण्यात आली आहे. या ट्रेनचा वापर विशेष करून ऐतिहासिक किंवा डोंगराळ मार्गांवर होईल. त्याचबरोबर सिस्टम इंटिग्रेशन युनिट बॅटरी आणि दोन फ्युएल युनिट सिंक्रोनायजेशन याची सुद्धा यशस्वी चाचणी झाली आहे. यामध्ये विद्यमान डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (DEMU) रेकमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल बसवण्याचा प्रकल्प आणि आवश्यक पायाभूत सुविधा देण्याचे काम चालू आहे.

PEM हायड्रोजन पुरवठा –

हरियाणामध्ये 1 मेगाव्हेट PEM इलेक्ट्रोलायझरद्वारे ट्रेनसाठी हायड्रोजन पुरवठा केला जाणार आहे. इलेक्ट्रोलायझर सतत कार्यरत राहून , रोज सुमारे 430 किलोग्राम हायड्रोजन उत्पादन करेल. त्याचबरोबर पायाभूत सुविधांमध्ये 3000 किलोग्राम हायड्रोजन साठवणूक युनिट समाविष्ट असणार आहे. जे ट्रेनसाठी महत्वाचे ठरेल.