भरदिवसा महिलेने चोरले पाच लाखांचे दागिने; आरोपी महिला कॅमेऱ्यात कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | भरदिवसा घरात प्रवेश करत त्यांनी पाच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार सिडको एन 2 मधील सदाशिवनगर येथील रहिवासी रमेश कोंडू तायडे (वय 62) यांनी शुक्रवारी दुपारी पत्नी आणि सुने सह जेवण केले. त्यानंतर त्यांची सून रूम मध्ये जाऊन आराम करीत होती तर तायडे हे त्यांच्या पत्नीसह समोरच्या खोलीत दुपारी आराम करत होते. यावेळी त्यांच्या घराच्या मुख्य हॉलचे दार आणि स्वयंपाक घराचे दार उघडे होते. ते झोपलेल्या रूम मध्येच कपाट पाठवते आणि या रूमला त्यांनी लॉकही केलेले नव्हते. त्याच रूम मध्ये असलेल्या तायडे दाम्पत्याला डोळा लागला आणि तेवढ्यात घात झाला.
याच वेळी चोरट्याने घराच्या प्रवेश करुन कपाटात तनिष्कच्या बॅगेत ठेवलेले 4 लाख 96 हजार 423 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दागिन्यांची बॅग चोरट्यांनी पळवली. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तायडे कुटुंब झोपेतून उठताच त्यांना कपाट उघडे दिसले. त्यातील दागिन्यांची बॅग गायब झाल्याचे त्यांना लक्षात आले. या प्रकरणी रमेश तायडे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी ठाण्यात रात्री गुन्हा नोंदवण्यात आला.

महिलेने चोरले होते दागिने

तायडे यांच्या घरातून दागिन्यांची बॅग चोरून येणारी संशयित महिला एन 2 येथील सीसीटीव्ही कॅमेरा चित्रित झाली आहे. या कॅमेर्‍याचे फुटेज पाहून पोलिसांनी त्या महिलेचा शोध सुरू केला. उघड्या घरातून मोबाईल पैशाचे पाकीट चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या महिलेने ही चोरी केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला.

Leave a Comment