२० महिलांसोबत पंचतारांकित हाॅटेल मध्ये एकांतवासात आहे ‘या’ देशाचा राजा, घ्या जाणुन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सध्या जगातील अनेक बाधित देशांमध्ये लॉकडाउन सुरू आहे. युरोपीय देश जर्मनीलाही कोरोनाचा फटका बसला आहे व तेथेही लॉकडाउन चालू आहे. लोक स्वत: ला आइसोलेट ठेवत आहेत. पण अशा परिस्थितीत एक विचित्र बातमी समोर आली आहे. यावेळी, थायलंडचा राजा देखील तेथे आहे. ते आइसोलेशन मध्ये आहेत परंतु एकटेच नाहीत तर २० महिलांसह आहेत !

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दक्षिण जर्मनीतील एका हॉटेलमध्ये किंग वजीरालॉन्गकोर्न (Maha Vajiralongkorn) जिथे त्यांना राम (दहावा) म्हणूनही ओळखलले जाते त्यांनी या पंचतारांकित हॉटेलच्या सर्व खोल्या बुक केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून हॉटेलच्या सर्व खोल्या बुक करण्याची परवानगी घेतली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, काही महिन्यांपूर्वीच वजीरलांगकोर्नने चौथ्यांदा लग्न केले होते. पण त्याची चौथी पत्नी हॉटेलमध्ये आहे की नाही हे माहिती नाही. असा विश्वास आहे की थायलंडचे राजे जर्मनीला आपले दुसरे घर मानतात.ते आपला बराच वेळ इथेच घालवतात. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या फेब्रुवारीपासून ते जर्मनीमध्येच असून आपल्या देशात अजून गेलेले नाही.

अहवालानुसार, राजा अजूनही जर्मनीमधील हॉटेलमध्येच असून त्यांच्याबरोबर २० महिला आहेत. तथापि, वर्तमानपत्राने असे म्हटले आहे की त्याविषयी अधिक माहिती केवळ तेव्हाच कळेल जेव्हा त्यांचा सेल्फ आइसोलेशनची काळ संपेल.

राजा वजीरलांगकोर्न यांनी आपल्या बॉडीगार्डशी लग्न करून सर्वांना चकित केले होते. काही दिवसांनी वजीरलाँगकोर्नचा राजतिलक होणार होता. लग्नानंतर त्यांच्या बॉडीगार्डला राणीचा दर्जा मिळाला. २०१४ मध्ये किंग वझिरलंगकोर्न यांनी सुथिदाला त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकाचा डेप्युटी कमांडर बनविला. यापूर्वी ती थाई एअरवेजवर फ्लाइट अटेंडंट होती. या दोघांच्या नात्याबद्दल परदेशी माध्यमांमध्ये बर्‍याच वेळा चर्चादेखील झाल्या पण सुथिदाबद्दल राजाने अधिकृतपणे कधीच काही सांगितले नाही. याआधी वजीरॉन्गकोर्न यांचे तीन वेळा लग्न झाले होते आणि तिन्ही पत्नीपासून घटस्फोट झाला आहे. राजाला एकूण ७ मुले आहेत.

२०१९ मध्ये बँकॉकच्या भव्य राजवाड्यात राजा महा वजीरोलॉन्गकोर्न यांचा राज्याभिषेक भव्य पद्धतीने झाला. तथापि, यापूर्वी, थायलंडमध्ये त्यांच्या राजा होण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह होते. राज्याभिषेकाच्या अवघ्या तीन दिवस आधी चौथ्या लग्नामुळे ते जगभर चर्चेत आले होते.राज्याभिषेक बँकॉकमधील ग्रँड पॅलेस येथे झाला. ग्रँड पॅलेसमध्ये राजाने मुकुट घातला होता जो सामर्थ्याने देव म्हणून पाहिले जाण्याचे प्रतीक आहे. राजाचा मुकुट ७.३ किलो आणि ६६ सें.मी.उंच आणि २०० वर्ष जुना आहे. मुकुट परिधान केल्यानंतर,त्यांना देशाच्या सरकारच्या कार्यात थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर

धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

Leave a Comment