औरंगाबाद | पैठणगेट जवळील मोकळ्या जागेवर पाच मजली मल्टी स्टोरेज पार्किंग बांधण्यात येणार आहे. या कामासाठी मनपाकडून प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यासंदर्भात निविदा प्रसिद्ध केली आहे. ही इमारत बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वानुसार विकसित करण्यात येणार आहे.
हाती आलेल्या माहितीनूसार, औरंगाबाद स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील चार प्रमुख रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या विकासासाठी चार आर्किटेक्ट संस्थाची नियुक्ती करण्यात येत आहे. पैठण गेट गुलमंडी हा रस्ता नो व्हेईकल रस्ता तयार करण्यात येणार आहे. वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसाठी पैठण गेटवर पाच मजली मल्टी स्टोरेज इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली असून निविदा प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल.
शहरातील मुख्य बाजारपेठ असल्यामुळे पैठण गेट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी असते. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने व्यापाऱ्यांसह बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना पार्किंगची अडचण निर्माण होते. बऱ्याच वेळा वाहनाची वाहतूक कोंडी देखील होते. आता जुन्या शहरातील पैठण गते गुलमंडी हा नो व्हेईकल रस्ता म्हणून विकसित करण्यात येणार आहे. तेथील मोकळ्या जागेवर पाच मजली मल्टी स्टोरेज पार्किंग बांधण्यात येत असल्याने पार्किंगची अडचण आता दूर होणार आहे.