दीपिका कुमारी, ज्योत्स्ना चिनाप्पा आणि सौरव घोषाल यांना कांस्यपदक
जकार्ता | येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत तजिंदर पाल सिंग याने गोळाफेक क्रीडा प्रकारात २०.७५ मीटर फेक करुन सुवर्णपदकाची कमाई केली. अथलेटिक्स मधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. याआधी दिवसभरात दीपिका पल्लीकल आणि ज्योत्स्ना चिनाप्पा यांनी स्क्वॅश क्रीडाप्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
मलेशियाच्या निकोल ऍन डेव्हिडने दीपिकाला तर त्याच देशाच्या शिवसंगरी सुब्रह्मण्यमने ज्योत्स्नाला पराभवाचा धक्का दिला. सौरव घोषाललासुद्धा उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
आतापर्यंत भारताच्या खात्यावर ७ सुवर्ण, ५ रौप्य व १७ कांस्यपदक जमा झाली आहेत. ७२ सुवर्णपदकांसह एकूण १५३ पदके मिळवत चीन पहिल्या स्थानावर आहे.
पदकांची आशा – ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मोहम्मद अनासने उपांत्य फेरी गाठली आहे. याशिवाय पीव्ही सिंधू व साईना नेहवाल यांनीही बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.