Diwali Sale : Flipkart वर अर्ध्या किमतीत मिळत आहेत ‘हे’ HD Smart TV

Smart Tv
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – Flipkart Big Diwali Sale संपायला अवघे काही तास उरले असताना, ग्राहक इथून इलेक्ट्रॉनिक्स, गॅझेट्स अ‍ॅक्सेसरीज आणि बऱ्याच गोष्टी खरेदी करत आहेत. यामध्ये स्मार्ट टीव्ही अर्ध्या किमतीत मिळत आहेत. फक्त 7,199 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीपासून तुम्ही Mi, Samsung, Reality सारख्या ब्रँडचे टीव्ही दिवाळीला तुम्ही आपल्या घरी आणू शकता. चला तर जाणून घेऊन या यादीमध्ये कोणकोणत्या टीव्हीचा समावेश आहे.

1) Infinix Y1 (32-इंच) HD स्मार्ट टीव्ही
या सेलमध्ये Infinix Y1 (32-इंच) HD रेडी LED स्मार्ट लिनक्स टीव्ही रु.16,999 ऐवजी फक्त रु.7,999 मध्ये तुम्ही खरेदी करू शकता. या टीव्हीवर ग्राहकांना 52% ची सूट दिली जात आहे. म्हणजेच हा टीव्ही निम्म्याहून कमी किमतीत घरी आणता येईल. त्याचा HD Redmi 1366×768 पिक्सेलचा डिस्प्ले आहे. या टीव्हीला 1 वर्षाची वॉरंटी आहे.

2) Thomson 9A Series
थॉमसन 9A मालिका (40 इंच) फुल एचडी एलईडी स्मार्ट टीव्ही 30% च्या सवलतीत घरी आणू शकतात. सेलमध्ये हा टीव्ही 21,499 रुपयांऐवजी केवळ 14,999 रुपयांमध्ये मिळत आहे. तसेच यामध्ये एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना 11,000 रुपयांची सूटदेखील देण्यात येत आहे. याचा डिस्प्ले HD Redmi 1920×1080 pixels एवढा आहे.

3) Realme (32 इंच) HD स्मार्ट टीव्ही
Realme (32 इंच) HD रेडी LED स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही यावर ग्राहकांना 38% सवलत मिळत आहे. हा टीव्ही 17,999 रुपयांऐवजी केवळ 10,999 रुपयांना या सेलमध्ये मिळत आहे. या टीव्हीचा डिस्प्ले HD Redmi 1366×768 पिक्सेलचा आहे.

4) Mi 5A (32-इंच) HD स्मार्ट टीव्ही
Mi 5A (32-इंच) HD रेडी LED स्मार्ट Android TV यावर ग्राहकांना 48% सूट मिळत आहे. हा टीव्ही सेलमध्ये ग्राहकांना 24,999 रुपयांऐवजी केवळ 12,999 रुपयांमध्ये मिळत आहे. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत 11,000 रुपयांची अधिक सूट मिळणार आहे. हा टीव्ही डॉल्बी साउंडसह येतो आणि त्याचा डिस्प्ले HD Redmi 1366×768 पिक्सेलचा आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!