SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील दर वाढवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सरकारी बँक असलेल्या एसबीआयकडून ग्राहकांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आता बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात 20 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. 15 ऑक्टोबर 2022 पासून FD वरील हे नवीन व्याजदर लागू होतील.

SBI, HDFC hike interest rates for fixed deposits. Check latest rates here - Hindustan Times

बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर रिटेल टर्म डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ केली आहे. आता SBI कडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर सर्वसामान्यांना 3.00% ते 5.85% तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% आणि 6.65% दराने व्याज दिले जात आहे.

THIS bank has revised interest rates on FD and savings accounts

बँकेच्या FD वरील नवीन व्याजदर तपासा

7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3 टक्के व्याजदर
46 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या FD वर चार टक्के व्याजदर
180 ते 210 दिवसांच्या FD वर 4.65 टक्के व्याजदर
211 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.70 टक्के व्याजदर
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.60 टक्के व्याजदर
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.65 टक्के व्याजदर
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कालावधीच्या FD वर 5.80 टक्के व्याजदर
5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीच्या FD वर 5.85 टक्के व्याजदर

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

ज्येष्ठ नागरिकांसाठी FD वरील व्याजदर

आता बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवरील व्याजदरात 10 ते 20 bps ने वाढ करण्यात आली आहे. या बदल नंतर आता 3.5 टक्के ते 6.65 टक्के व्याज दर मिळणार आहे.

SBI Annuity Deposit Scheme: All you need to know

SBI ‘Wecare Deposit’

SBI कडून आपल्या Wecare सीनियर सिटीजन टर्म डिपॉझिट्स स्कीमच्या व्हॅलिडिटीचा कालावधी पुढील वर्षी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीच्या डिपॉझिट्स वर 30 बेसिस पॉइंट जास्त प्रीमियम व्याज मिळेल. पाच वर्षांपेक्षा कमी टर्म डिपॉझिट्सवर सामान्य नागरिकांपेक्षा 0.50 टक्के जास्त व्याज मिळेल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या रिटेल टर्म डिपॉझिट्सवर 0.80 टक्के (0.50 +0.30) जास्त व्याज दिले जाईल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/deposit-rates/retail-domestic-term-deposits

हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून 184 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त