Flipkart Sale | Flipcart वर सुरु झाला मोठा सेल; 75 इंच टीव्ही मिळणार अर्ध्या किमतीत

Flipkart

Flipkart Sale | फ्लिपकार्ट ही आपल्या देशातील एक सगळ्यात मोठी इ कॉमर्स कंपनी आहे. त्यांच्या ग्राहकांना जोडून ठेवण्यासाठी कंपनी नेहमीच ऑफर्स देत असते. अशातच आजपासून म्हणजे 24 नोव्हेंबरपासून फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झालेला आहे. हा सेल 29 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही असे अनेक प्रोडक्ट विकत घेऊ शकता. त्यावर तुम्हाला चांगले डिस्काउंट देखील मिळणार आहे. या आधी प्लॅटफॉर्म टीव्हीवर देखील चांगल्या ऑफर होत्या. परंतु आता 75 इंच 4k स्मार्ट टीव्हीवर या ऑफर्स आहे. तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टचा हा सेल तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.

सगळ्यात पहिला Hisense कंपनीकडून हा एक नवीन टीव्ही आला आहे. या टीव्हीची उंची 75 इंच एवढी आहे. कंपनीने हा टीव्ही 1 लाख 49 हजार 999 रुपयांना लॉन्च केला होता. परंतु तो आता 96 हजार 999 खरेदीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही एचडीएफसी बँकच्या क्रेडिट कार्ड ईएमआय द्वारे या टीव्हीवर 2500 रुपयांपर्यंत बचत करू शकता. तसेच टीव्ही एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही 3100 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

यामध्ये दुसरा टीव्ही थॉमसनच्या 4k स्मार्ट टीव्ही आहे. ही कंपनी तुम्हाला टीव्हीवर 50% सूट देत आहे. हा टीव्ही 1 लाख 50 हजार 999 लॉन्च करण्यात आला होता. परंतु आता तुम्ही फक्त 74999 खरेदी करू शकता. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआय द्वारे 3500 रुपयांपर्यंत तुम्ही सूट मिळू शकता. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही 3000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

या ऑफरमधील आणखी एक टीव्ही हा sansui कंपनीचा आहे. हा टीव्ही देखील अत्यंत उत्तम फीचर्सचा आहे. या पूर्वी याची किंमत 1 लाख 69 हजार रुपये एवढी होती. परंतु तुम्ही तो केवळ आता 84890 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला 50 टक्के सूट मिळत आहे. त्याचप्रमाणे एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड द्वारे तुम्ही या टीव्हीवर 5000 रुपये पर्यंत बचत करू शकता. तसेच या टीव्हीवर कोणतीही एक्सचेंज ऑफर नाही.