हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Flying Bus। आजकाल तंत्रज्ञानाने एवढी मोठी प्रगती केली आहे कि, ज्या गोष्टी तुमच्या आमच्या मनातही आल्या नसतील अशा गोष्टी आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळाल्या. तुम्ही आत्तापर्यंत हवेत उडणारी बाईक, किंवा हवेत उडणारी कार ऐकली असेल किंवा बघितली असेल. परदेशात अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित झालं आहे. पण आता आपल्या भारतात तुम्हाला चक्क हवेत उडणारी बस बघायला मिळेल. होय, आम्ही गंमत करत नाही, तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीच याबाबत माहिती दिली आहे. उत्तराखंड राज्यातील डेहराडून मध्ये हि हवेत उडणारी बस चालवण्याच गडकरींच्या डोक्यात आहे.
नितीन गडकरी काळ उत्तराखंडला होते. त्याठिकाणी एका खाजगी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी वाहतूक कोंडीची समस्या आणि त्यावरील उपाय यावर बोलताना नितीन गडकरींनी हवेत उडणाऱ्या डबल डेकर बस बद्दल भाष्य केलं. गडकरी म्हणाले,मी प्रत्येक वेळी विमानाने किंवा हेलिकॉप्टरने उत्तराखंडला आलोय. एकदा तर कारने देखील आलो. याठिकाणी भरपूर प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे माझं स्वप्न आहे कि येथे हवेत उडणारी (Flying Bus) डबल डेकर बस चालवावी. या बस मध्ये १०० ते १५० प्रवाशी लोक हवेतून प्रवासाचा आनंद घेतील. याठिकाणी सर्वकाही शक्य आहे असं म्हणत उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी या हवेत उडणाऱ्या डबल डेकर बसचा प्रस्ताव पाठवावा असेही गडकरींनी सांगितलं.
हवेत उडणाऱ्या बसचा काय फायदा होईल? Flying Bus
गडकरींनी सांगितल्याप्रमाणे खरंच हवेत उडणारी बस (Flying Bus) आली तर दळणवळण क्षेत्रांत मोठा कायापालट होईल. लोकांना वाहतूक कोंडीच्या कटकटी मधून सुटका मिळेल. या डबल डेकर बसमध्ये अधिक लोक एकत्र प्रवास करू शकतील, परिणामी सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढेल. त्याचबरोबर जर या बस इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड असतील तर प्रदूषणही कमी होईल. एकूणच काय तर हवेत उडणाऱ्या बसचे असंख्य फायदे पाहायला मिळतील.
दरम्यान, या कार्यक्रमानंतर नितीन गडकरी यांची रोपवे प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री धामी यांच्यासोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री धामी यांनी मानसखंड मंदिर माला मिशन अंतर्गत ५०८ किमी लांबीचे २० मोटार मार्ग दुपदरी करून राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करावेत अशी विनंती केली. धामी यांनी याबाबत पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले असल्याचे सांगण्यात येत आहे.