Flying Taxi : बाब्बो!! हवेत उडणारी टॅक्सी; आनंद महिंद्रानी शेअर केला फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या जगात आपल्याला अनेक नवनवीन आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरताना दिसत आहेत. खासकरून ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये नवी क्रांती मागील काही वर्षात झाली आहे. बाजारात सध्या इलेक्ट्रिक गाड्या, cng गाड्या तसेच इथोनॉल वर चालणारी कार दाखल झाली आहे. आता तर तुम्ही भारतात हवेत उडणारी टॅक्सी (Flying Taxi) सुद्धा पाहू शकता… होय ऐकायला विचित्र वाटत असलं तर सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या जगात हे शक्य आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सोशल मीडियावर या हवेत उडणाऱ्या टॅक्सीची झलक शेअर केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत या एअर टॅक्सीचा फोटो शेअर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटल की IIT मद्रास भारतातील पहिली इलेक्ट्रिक टॅक्सी बनवण्यासाठी एक ePlane कंपनी तयार करत आहे. ही इलेक्ट्रिक फ्लाइंग कार (Flying Taxi) पुढील वर्षापर्यंत उड्डाण करू शकते. यासह, त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये IIT मद्रासचे वर्णन जगातील एक रोमांचक आणि सक्रिय इनक्यूबेटर म्हणून केले आहे. आनंद महिंद्रा यांनी इन्क्युबेटर्सच्या वाढत्या संख्येबद्दल देशाचे आभार मानले आणि आता देश नवीन शोध लावण्यात मागे नसल्याचे सांगितले. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये IIT मद्रासने बनवलेल्या इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सीची वैशिष्ट्ये देखील शेअर केली आहेत.

200 किलोमीटर रेंज – Flying Taxi

हि हवेत उडणारी टॅक्सी येत्या वर्षभरात देशातील प्रवाशांच्या सेवेत येईल असा विश्वास आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केला. आयआयटी मद्रासच्या सहकार्याने इप्लेन कंपनी ही एअर टॅक्सी विकसित करत आहे. इप्लेन ही चेन्नई मधील एक स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीला गेल्या वर्षी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून इलेक्ट्रिक विमाने तयार करण्यासाठी मंजुरी मिळाली होती. विमानाने आपल्या एअर टॅक्सीला E200 असे नाव दिले आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ते 200 किलोमीटरचे अंतर कापू शकते असा कंपनीचा दावा आहे. हि एअर टॅक्सी बाजारात लाँच झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न काही काळ मिटू शकतो. तो टॅक्सी पूर्णपणे इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये तयार करण्यात आली आहे. या फ्लाइंग टॅक्सीच्या किमतीबाबत कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.