FM निर्मला सीतारमण यांनी संसदेत हे स्पष्ट केले की,”आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र अधिक चलन छापणार नाही”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाच्या संकटामुळे देशाच्या अर्थकारणावर चांगलाच परिणाम झाला आहे. मागील वर्षापासून आतापर्यंत लाखो लोकांनी नोकर्‍या गमावल्या असून कोट्यावधी लोकांच्या रोजगाराची कामे ठप्प झाली आहेत. अशा परिस्थितीत अनेक अर्थशात्रज्ञ आणि तज्ज्ञांनी केंद्र सरकारला नवीन चलनी नोटा छापून अर्थव्यवस्थेला बळकट करण्याच्या आणि लोकांच्या नोकर्‍या वाचविण्याच्या सूचना केल्या. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या आजारामुळे होणाऱ्या सध्याच्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी चलनी नोटा छापण्याची सरकारची कोणतीही योजना नाही.

“GDP 7.3 टक्क्यांनी घटेल”
सोमवारी लोकसभेत अर्थमंत्री सीतारमण यांना विचारले गेले की, आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी चलन छापण्याची काही योजना आहे का? यावर त्या म्हणाल्या की,” नाही सर… अशी कोणतीही योजना नाही. अर्थमंत्री सीतारमण यांनी लोकसभेतील दुसर्‍या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, 2020-21 च्या आर्थिक वर्षात भारताचा वास्तविक जीडीपी 7.3 टक्क्यांनी कमी होईल.” त्या म्हणाल्या की,” विकास दरात अंदाजे घट ही कोरोना साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी घेतलेल्या उपायांमुळे झाली आहे.”

’29 लाख कोटींपेक्षा जास्त पॅकेज जाहीर केले’
केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की,”2020-21 आर्थिक वर्षात आर्थिक वाढीसाठी आणि रोजगारात वाढ होण्यासाठी सरकारने आत्मनिर्भर भारत अंतर्गत 29.87 लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक आणि सर्वसमावेशक पॅकेज जाहीर केले होते. तसेच कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेचा परिणाम स्थानिक प्रयत्नांद्वारे कमी केला जाऊ शकतो. त्याच वेळी, लसीकरण मोहिमेची गती वाढवूनही हे नियंत्रित केले जाऊ शकते असेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment