Fofsandi Village | महाराष्ट्रातील ‘या’ गावात असतो फक्त 6 ते 7 तासांचा दिवस; मोठ्या संख्येने पर्यटक देतात भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Fofsandi Village | आपला महाराष्ट्र हा विविध संस्कृतीने आणि परंपरेने नटलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. जे पाहण्यासाठी अगदी परदेशातून देखील लोक येत असतात. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra) अशा काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या ऐकून कोणालाही विश्वास बसणे खूपच कठीण असते. अशातच आपण महाराष्ट्रातील एका अशा गावाबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे दिवस केवळ सहा ते सात तासांचा असतो. या गावांमध्ये सूर्योदय दोन ते अडीच तास उशिरा होतो. आणि दिवसही कमी असतो. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये (Fofsandi Village) हे गाव वसलेले आहे. परंतु या गावचे निसर्ग अगदी नयनरम्य आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक देखील येत असतात. महाराष्ट्रातील या गावाचे नाव अहमदनगर फोफसंडी असे आहे. आता या गावाच्या कथाही तेवढ्या रंजक आहेत. आता त्या गोष्टी आपण जाणून घेऊया.

सुरुवातीला भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट होती. या राजवटीदरम्यान त्या ठिकाणी फोक नावाचा एक इंग्रज अधिकारी होता. जो सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी अत्यंत विश्रांतीसाठी आणि आरामात दिवस घालवण्यासाठी एका गावात येत असे आणि तेच हे गाव आणि तेव्हापासून या ठिकाणाचे नाव फॉफसंडे असे पडले. परंतु त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे फोफसंडी हे नाव गावाला मिळाले.

या गावाची विशेष गोष्ट म्हणजे या फोफसंडी (Fofsandi Village) गावात अजूनही ब्रिटिश अधिकाऱ्याच्या त्या गेस्ट हाऊसचे अवशेष आहेत. आणि ते पाहण्यासाठी अनेक लोक येतात. हे गाव निसर्गाच्या सानिध्यात असल्याने निसर्गाने देखील त्याला भरभरून असं प्रेम दिलेले आहे. कारण या गावात नदी, धबधबा, डोंगर, हिरवी वनराई दुर्मिळ पक्षी असे अनेक जैवविविधता आपल्याला या गावात पाहायला मिळते.

फोफसंडी हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला या तालुक्यात आहे. या गावात अनेक प्रकारची लोक राहतात. या गावात बारा वाड्या आहेत यात वडे, पिचड, कोंढार, भगत, गोरे, उंबरे, गवारे, मेमाणे, भांगरे यांसारख्या आडनावाची लोक राहतात. हे गाव निसर्गाच्या सानिध्यात असले तरी भौतिक गरजांपासून हे गाव अजूनही वंचित आहे. या ठिकाणी रस्ता पाणी वीज यांसारख्या गोष्टींची कमतरता आहे. शेतीला देण्यासाठी देखील पाणी नसल्यामुळे या गावात अजूनही लोकांना चांगली पिकं घेता येत नाही.

या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. पावसाळ्यातील चार महिन्यात हे लोक शेती करतात आणि उरलेल्या आठ महिन्यात ते पुणे, ठाणे यांसारख्या ठिकाणी जाऊन नोकरी करतात. या ठिकाणी भात, वरई, नागली यांसारखी पिके घेतली जातात. गावातील खास आकर्षण हे इथल्या गुहेचे आहे. असे म्हटले जाते की इथल्या एका गुहेमध्ये मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. आणि त्यावरूनच त्यांच्या नदीचे नाव मांडवी असे पडलेले आहे. या ठिकाणी पावसाळ्यात खूप जास्त पाऊस असतो आणि धबधबा देखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अनेक लोक या गावाला देखील भेट देतात.