बाजारात आलाय फोल्डिंग वाला Cooler, कुठेही घेऊन जा अन् गार व्हा; किंमत किती?

Folding Cooler
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. उन्हाच्या कडाक्याने जनता चांगलीच हैराण झाली असून अशा वेळी थंड हवा मिळवण्यासाठी लोकांकडून फॅन, कुलर आणि AC चा वापर केला जात आहे. यापैकी AC च्या किंमती महाग असल्याने त्या आपल्यातील प्रत्येकालाच खरेदी करता येतील असे नाही. यासाठी कुलर एक चांगला पर्याय ठरतोय. Ac च्या तुलनेत कुलरच्या किंमती परवडणाऱ्या देखील असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहेत. जर आपणही या रणरणत्या उन्हामध्ये थंड हवा मिळवण्यासाठी नवीन कूलर घेणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुला चक्क फोल्डिंग वाल्या कुलर बाबत सांगणार आहोत.

Hindware i-FOLD 90L असे या कुलरचे नाव असून त्याची खास गोष्ट म्हणजे तो अगदी सहजरीत्या फोल्ड देखील करता येतो. हा कुलर फोल्ड करायला अवघी 5 मिनिटे लागतात. महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकांच्या घरात जागा कमी आहे अशा लोकांसाठी तर हा फोल्ड वाला कुलर खूपच उपयुक्त ठरू शकेल. कारण हा फोल्ड करून आपल्या टेबलाखाली आरामात ठेवता येईल. याशिवाय तुम्ही कुठे फिरायला बाहेर जाणार असाल तर तेव्हा सुद्धा हा कुलर फोल्ड करून अगदी सहजपणे गाडीमध्ये ठेवता येईल.

फीचर्स –

या फोल्डिंग वाल्या कुलरचे फीचर्स सांगायचे झाल्यास, या कुलरचे वजन 13.9 किलो आहे. यामध्ये 90 लिटर पाण्याची टाकी मिळते. हा कुलर हाताळण्यासाठी आणि स्पीड कंट्रोल करण्यासाठी 3 कस्टम ऑप्शन देखील दिले गेले आहेत. हा फोल्डिंग वाला कुलर इन्व्हर्टरवर सुद्धा चालतो. कुलरच्या तळाशी चाके देण्यात आली आहेत याला हॅन्डलही आहेत ज्याद्वारे तुम्ही या कुलरला एका जागेवरून दुसरीकडे सहज हलवू शकता. तुम्ही या कुलरपासून 10 मीटर अंतरावर थांबला तरी सुद्धा तुम्हाला आरामात त्याची हवा घेता येते.

किंमत –

तुम्हांला हा फोल्डिंग वाला कुलर खरेदी करायचा असेल तर तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर जावा. त्याठिकाणी 13,799 रुपयांमध्ये हा कुलर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय या फोल्डेबल कुलरसाठी ग्राहकांना एक वर्षाची वॉरंटी देखील दिली जाणार आहे.