कामगारांच्या लसीकरणासाठी आता उद्योजकांकडून पाठपुरावा

0
29
corona vaccine
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : गेल्या महिन्यात लॉकडाऊन असल्याकारणाने अनेक उद्योगव्यवसाय बंद होते. यामुळे कामगारांची परिस्थिती हलाखीची झाली होती. पण जुन महिन्यात लॉकडाऊन उघडण्यात आले. आणि लसीकरणास देखील वेग आला. टप्प्याटप्प्याने नागरिकांच्या लसीकरण सुरुवात झाली. कामगारांना लसीकरण घेणे आवश्यक आहे. असे असताना देखील वाळूज येथे एकच लसीकरण केंद्र आहे.

आता याबाबत उद्योजक संघटनेच्या वतीने कामगारांच्या लसीकरणासाठी प्रशासनाकडे पाठपुरवठा सुरु केला आहे. वाळूज येथील मसिआ सभागृहात मसिआ सीएमआय, सीआयआयए उद्योजक संघटनेच्या वतीने कामगारांच्या लसीकरणासाठी उद्योजकांचा पुढाकार व लसीकरण केंद्र सुरु करणे या विषयी बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मसिआ, सिएम आय, सिआयआयए उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लसीकरण मोहिमेला नागरिक व कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. तसेच गेल्या काही दिवसांपासुन परिसरात लस घेतल्याशिवाय कामगारांना कामावर घेतले जाणार नाही. अशी अफवा पसरवली जात आहे असेही त्यांनी सांगितले.

या अफवामुळे कामगारात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक क्षेत्रात प्रत्येक नागरिकाला लस घेणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रातील उद्योग सुरु ठेवणे कामगार व उद्योजकाच्या हिताचे असून कामगारांच्या लसीकरण केंद्रासाठी उद्योजक संघटनातून प्रशासनाकडे पाठपुरवठा सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला सीएमआयचे चेअरमन रमण आजगावकर, प्रसाद कोकिळ, मसिआचे अध्यक्ष नारायण पवार, उपाध्यक्ष अनिल पाटील, सहसचिव कमलाकर पाटील, राहुल मोगले, अनिल पाटील आदीची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here