सावधान ! तुम्ही येवले चहाचे शौकीन आहात ; येवले चहावर झाली अन्न प्रशासनाची कारवाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | अल्पावधीतच पुण्यात प्रसिद्धी पावलेल्या आणि महराष्ट्रभर विस्तारलेल्या येवले चहावर कारवाही अन्न प्रशासनाची कारवाही झाली आहे. मानवी शरीराला अपायकार असणाऱ्या मेलानाईटचा या चहात मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे तपासातून सिद्ध झाले असून ६ लाखांचा चहा, चहात टाकण्यात येणारा मसाला अन्न प्रशासनाच्या वतीने जप्त करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत (FDA) येवले चहावर कारवाही करण्यात आली असून पुढील निर्देश मिळे पर्यंत येवले चहा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. पुण्यातील अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री इम्रान हवालदार आणि रमाकांत कुलकर्णी यांनी येवला फुड प्रॉडक्ट गोडाऊनमधील विक्रीसाठी पॅकबंद करून ठेवलेला चहा पावडर, साखर, टी मसाला तापासासाठी जप्त केले आहेत. एकूण ६ लाखाचा माल त्यांनी जप्त केला आहे.

येवले चहा एकदा पिवून तरी पहा असं म्हणणाऱ्या येवले चहा वाल्यांना चहा सामग्रीची एकदा लॅब स्टेस्ट घेऊन तरी पहा असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण अन्न सुरक्षा आणि मानके कायदा सांगतो की मानव सेवनाचा एकदा पदार्थ तुम्ही ब्रँडच्या स्वरूपात विकत असाल तर तुमच्या ब्रँडची लॅब टेस्ट करणे गरजेचे आहे. एवढेच काय त्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे देखील संबंधित उद्योजकाला आवश्यक आहे. मात्र येवले चहा कंपनीने यापैकी काहीच केले नसल्याचे आजच्या तपासातून आढळून आले. त्याच प्रमाणे याच कायद्यांतर्गत काढावयाचा परवाना देखील येवले चहा कंपनीकडे नाही अशी धक्कादायक माहिती आजच्या तपासातून पुढे आली आहे.

Leave a Comment