झोमॅटो, स्विगीमधून जेवण ऑर्डर करणं महागलं; ऑर्डर रद्द करण्यासंबंधी निर्णय अधिक कठोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ऑनलाइन जेवण ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना आता अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटो आणि स्विगीनं गेल्या सहा महिन्यांत डिलिव्हरी शुल्क वाढवले आहे. त्यांनी डायनॅमिक डिस्काउंटिंग सुरू केलं आहे. ऑर्डर रद्द करण्यासंबंधी नियम अधिक कठोर केले आहेत. तसंच लॉयल्टी प्रोगामचे दरही वाढवले आहेत.

एकूणच डिस्काउंटमध्ये घट झाल्यानंतर या कंपन्यांनी उचललेल्या पावलांमुळं ऑर्डरची संख्या कमी झाली आहे. ‘झोमॅटोच्या बाबतीत सांगायचं झालं तर, ऑक्टोबरपासून दर महिन्यातील ऑर्डरचं प्रमाण पाच ते सहा टक्के कमी झाल्याचा अंदाज आहे. स्विगीच्या बाबतीत डिसेंबरपासून दर महिन्याला ऑर्डरचं प्रमाण साधारण पाच ते सहा टक्के घटलं आहे,’ अशी माहिती एका जाणकारानं दिली. या कंपन्यांनी नियम कठोर केल्यानं असं झालं आहे. उबर इट्स डीलनंतर या बाजारातील समीकरण किती बदलेल, हे पुढील महिन्यापर्यंत स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितलं.

उबर इट्स झोमॅटोनं विकत घेतलं

गेल्या आठवड्यात भारतात उबर इट्सला ३५ कोटी डॉलरना झोमॅटोनं खरेदी केलं. ही ऑल-स्टॉक डील होती. त्यात उबरला झोमॅटोमध्ये १० टक्के भागिदारी मिळाली. झोमॅटोनं ऑन टाइम किंवा फ्री डिलिव्हरीची सुविधा सुरू केली आहे. जर एखाद्या ग्राहकानं निवडक रेस्तराँला दहा रुपये अतिरिक्त मोजले तर ठरलेल्या वेळेवर डिलिव्हरी न दिल्यास फ्री ऑर्डर दिली जाईल. स्विगीनं काही शहारांमध्ये डिलिव्हरी चार्ज वाढवले आहेत. तर ऑर्डर रद्द करण्यासंबंधी नियम कठोर केले आहेत. लॉयल्टी प्रोग्राम सुपरचे दरही वाढवले आहेत.

अर्न्स्ट अँड यंगचे भागीदार अंकुर पाहवा यांनी सांगितलं की, ‘आता पुन्हा एकदा नफा वाढवण्यासाठी जोर दिला जात आहे. मार्केट लीडर्सना मोठी गुंतवणूक मिळत आहे.’ झोमॅटोनं ग्राहकांसाठी अंतर, ऑर्डर व्हॅल्यू, रेस्तराँ या आधारावर स्टॅगर्ड डिलिव्हरी चार्ज आकारण्यास सुरुवात केली आहे.

नाइट-टाइम डिलिव्हरी दर वाढले

झोमॅटोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, ‘या क्षेत्रातील वृद्धीनुसार फूड डिलिव्हरीसाठी शुल्क आकारले जात आहे.’ स्विगीनंही काही शहरांमध्ये डिलिव्हरी शुल्क आणि नाइट -टाइम डिलिव्हरी शुल्क वाढवले आहे. वेग आणि निवड आदींबाबत ग्राहकांना चांगली सेवा देण्यावर आमचा भर आहे, असं स्विगीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

Leave a Comment