रिलायंस फाऊंडेशन आणि सम्यक क्रांती कडून 2000 हजार रेशन किटचे वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | रिलायंस फाऊंडेशन आणि सम्यक क्रांती सामाजीक संस्था यांच्या वतीने औरंगाबाद-संभाजीनगर शहरात रेशन किट चे वाटप. मागच्या वर्षी प्रमाणे याही वर्षी कोरोनाच्या लॉकडाऊन मधे जनजीवन ठप्प झाले असुन, व्यापार उद्योग बंद असल्याने अनेक जन अडचणीत सापडले आहेत. रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अर्थव्यवस्था ठप्प असल्याने दैनंदिन गरजा भागविने शक्य होत नाही. अश्या बिकट परिस्थितीत गरजू ना संकट काळी मदती साठी रिलायंस फाऊंडेशन आणि सम्यक क्रांती सामाजीक विकास संस्था पुढे आली आहे.

मागच्या वर्षी प्रमाने याही वर्षी औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या कामगार, कष्टकरी, वसाहतीत जीवनावश्यक शीधा असलेल्या रेशन किट चे वाटप करण्यात येत आहे. दोन हजार रेशन किट चे वाटप आता पर्यन्त करण्यात आले आहे. ज्यात पाच किलो आटा, एक किलो साखर, एक लीटर तेल, एक किलो तुर डाळ, मीठ, हळद आणि सॅनीटायझर यांचा समावेश आहे.ब्रिजवाड़ी, भारत नगर, क्रांती नगर, भीम नगर, भावसिंगपुर, राहुलनगर, आंबेडकर नगर, घाटी कोरोना वार्ड, संघर्ष नगर, झालटा, पोखरी,पॉवरलूम, रोहिदास पूरा, पदमपुरा, हर्ष नगर,लेबर कॉलोनी, बालाजी नगर, महू नगर,सिद्धार्थ नगर, टी व्ही सेंटर, फुलम्बरी, गारखेड़ा,कैलाश नगर या भागात किट चे वाटप करण्यात आले, तसेच साफ सफाई कर्मचारी, बांधकाम मजूर, सेक्युरिटी गार्ड, निराधार, अपंग यांना ही या किट चे वाटप करण्यात आले. रिलायंस फाऊंडेशन चे दीपक केकान, आणि सम्यक संस्थेचे सतीश पट्टेकर यांनी यांच्या प्रयत्ना तुन या किट चे आयोजन करण्यात आले आहे.

सम्यक क्रांती सामाजीक विकास संस्थेचे अध्यक्ष काकाजी पट्टेकर, सचिव बाबासाहेब नरवड़े, सुभाष हिवराले, गणेश साबळे, आलमनुर पठान,रावसाहेब हिवराळे,श्रीकांत हिवराळे,नरेश पाखरे, प्रकाश नावतुरे, संदीप पट्टेकर, दीपक डांगरे,शांतिलाल राठौड़,जस्विन गोस्वामी, आकाश कव्हळे इत्यादि पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment