स्वयंपाक घरातील या टिप्स तुम्हाला माहित आहेत का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाककृती|आपण रोज स्वयंपाक घरात असतो, प्रत्येक वेळेस नवीन काही तरी बनवायचा प्रयत्न करतो असतो. स्वादिष्ट स्वयंपाक बनवणे हि एक कला आहे आणि तुमच्या उत्तम कलेला मदत करण्यासाठी ह्या काही खास टिप्स तुमच्या साठी.

१-पुरणपोळी कणिक दुधामध्ये भिजवावी म्हणजे मऊसर होते.
2- आईस्क्रीम डिशमध्ये देताना चमच्याला पाणी लावून द्यावे म्हणजे ते चिकटत नाही.
3-पुरणपोळीची कणिक भिजवताना कणकेत थोडीशी हळद घालावी म्हणजे पोळी पिवळसर येते.
४- इडलीचे पीठ चुकून पातळ झाले असेल तर त्यामध्ये थोडे पोहे मिक्सरमध्ये वाटून घालावेत.
५- भाजी करताना पिठामध्ये थोडे कॉर्नफ्लोवर घालावे म्हणजे भजी खुसखुशीत होतात.
६- कढीलिंबाचा पाला तेलात तळून ठेवला तर बरेच दिवस टिकतो व त्याचा वासही छान येति.
७- कडधान्य टिकवण्यासाठी थोडे मीठ टाकावे कीड लागत नाही.
८- तळण करताना तेल फसफासून येत असेल तर त्यामध्ये चिंचेचे एखादे बोतुक टाकावे म्हणजे तेल फसफसून येत नाही.
९- कोथिंबीर पुदिना स्वस्त मिळत असेल तेव्हा मोठ्या प्रमाणात आणून त्याची पावडर करून ठेवावी कामात येते.
१०- पालेभाजी शिजवताना किंचित थोडा सोडा घालावा म्हणजे भाजीला हिरवा रंग येतो

Leave a Comment