हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योग्य पौष्टिक आहार घेणे खूप गरजेचे असतो. आज काल लोकांची जीवन शैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यामुळे अनेक लोक घरचे जेवण न जेवता बाहेरील फास्ट फूड खातात. आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. तुम्ही जर पौष्टिक आहार घेतला नाही, तर शरीरात अनेक पोषण तत्त्वांची कमतरता असते. त्यात आजकाल रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात चालू झालेल्या आहेत.
जर तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाली तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात असणे खूप गरजेचे असते. तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाली तर तुम्हाला अशक्तपणा येतो, थकवा जाणवतो तसेच श्वास घेण्यास देखील त्रास होतो. तुम्हाला जर अशा काही समस्या जाणवत असेल, तर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि उपचार देखील सुरू करा. हिमोग्लोबिनची कमी झाल्यावर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मनुके आणि खजूर
ड्रायफ्रूट्स हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यातही मनुके आणि खजूर खाल्ल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. यामध्ये असलेले अनेक घटक आरोग्य देखील सुधारतात. मनुक्यांमध्ये फॉलिक ऍसिड आढळते. त्यामुळे रक्तातील लाल पेशी वाढतात. तसेच सकाळी उठल्यावर जर तुम्ही नियमितपणे मनुके खाल्ले, तसेच खजूर देखील खाल्ले, तर रक्तातील लाल पेशी वाढविण्यास त्याची मदत होते.
पालक
पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि जीवनसत्व असतात. तुम्ही जर रोजच्या आहारात एक तरी पालेभाजी सेवन केले, तर तुमच्या आरोग्याला त्याचे खूप फायदे होतात. पालेभाज्या खाल्ल्याने आपल्याला चांगले पौष्टिक तत्त्व मिळतात. तसेच हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यातही पालकमुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
ब्रोकोली
फ्लॉवरप्रमाणे हिरव्या रंगाची दिसणारी ब्रोकोली देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. ब्रोकोलीमध्ये विटामिन सी आणि आयन भरपूर प्रमाणात असतात. तसेच अँटीऑक्सिडंट देखील असतात. यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. आणि शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. तुम्ही जर ब्रोकोलीचे सूप किंवा इतर पदार्थ बनवून खाल्ले तर तुमच्या शरीराला याचा खूप फायदा होतो.
बीट
तुम्ही जर लोहयुक्त बीटाचे दररोज सेवन केले, तर तुमच्या शरीरातील रक्ताची तसेच पातळी देखील वाढते. बीटाचा रस तुम्ही नियमित पिल्यावर तुमचे आरोग्य देखील सुधारते. तसेच आयर्न आणि प्रोटीनची कमतरता भरून निघते. शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया देखील चांगली होते. बीट मुळे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. तसेच साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी देखील बीटचा फायदा होतो.