थायरॉईडच्या रुग्णांसाठी हे 5 पदार्थ आहेत फायदेशीर; आजच करा जेवणात समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल लोकांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. अगदी लहानापासून ते वृद्धांपर्यंत कोणाला कोणता आजार होईल हे सांगता येत नाही. आजकाल थायरॉईड हा मोठ्या प्रमाणात पसरलेला रोग आहे.अनेक महिलांना हा आजार होत असतो. थायरॉईड हा एक असा आजार आहे. तो कोणत्याही वयात व्यक्तीला होऊ शकतो. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, जर तुमची जीवनशैली चांगली नसेल तुम्ही जर निरोगी राहत नसाल, तर हा आजार तुम्हाला होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे तुम्हाला औषधंसोबत पौष्टिक आहार आणि चांगल्या जीवन शैलीचा अवलंब करणे देखील गरजेचे आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल, तर सगळ्यात आधी तुमचा आहार चांगला असणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही चांगल्या आहाराचा समावेश केला, तर तुम्ही निरोगी राहू शकता. तसेच तुमच्या शरीराला चांगली ऊर्जा आणि पोषण देखील प्राप्त होते. जर तुम्हाला थायरॉईड झाला असेल तर असे काही खाद्यपदार्थ आहेत. ज्याचे तुम्ही सेवन केल्यावर तुमचा थायरॉईड कमी होते आता जाणून घेऊया या पदार्थांबद्दल.

नारळ

तुम्हाला जर थायरॉईडची समस्या असेल, तर तुम्ही ओला नारळ खाऊ शकता. तुम्ही आहारात नारळाचा वापर कोणत्याही स्वरूपात करू शकता. म्हणजेच तुम्ही कच्चा नारळ खाऊ शकता, तसेच त्याची चटणी किंवा लाडू बनवून खाऊ शकता.

आवळा

थायरॉईड कमी करण्यासाठी आवळा उपयुक्त आहे. तसेच तुम्ही आवळा पावडर मधासोबत खाल्ली किंवा आवळ्याचा रस कोमट पाण्यासोबत पिला तरी देखील तुमचे थायरॉईड नियंत्रणात राहील.आवळ्यापासून तुम्हाला इतर अनेक फायदे देखील होतात.

सफरचंद

सफरचंद हे सगळ्या आजारांवरचे एक प्रभावशाली औषध आहे. यामध्ये पेक्टीन आणि फायबर जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातिफिकेशन होण्यासाठी मदत करते. आणि तुमची थायरॉईड नियंत्रणात राहते. म्हणून तुम्ही दररोज एका सफरचंदाचे सेवन केले, तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर होईल.

अंडी

दररोज अंडी खाणे हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते. तसेच कर्करोगाचा धोका कमी होतो. अंड्यामध्ये प्रथिने ओमेगा थ्री असिड सेलेनियम आणि आयोडीन यांसारखे पोषक घटक असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच यामुळे थायरॉईड कमी होण्यासाठी देखील मदत होते.

भोपळ्याच्या बिया

तुम्ही जर दररोज भोपळ्यांच्या बियांचे सेवन केले, तर तुमचा थायरॉईड नियंत्रण राहण्यास मदत होते. कारण या भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक असते. यामुळे थायरॉईड संप्रेरके तयार होण्यास मदत होते. म्हणून भोपळ्याच्या बियांचे दररोज सेवन करावे.