फुटबॉल फिव्हर : तांबवेत राज्यस्तरीय स्पर्धेला मुंबई, पुण्यातील संघाचा सहभाग

Football Match Tambave
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
तांबवे (ता. कराड) येथील कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्टच्या फुटबॉल टिमचे वतीने स्वा. सै. आण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या क्रीडांगणावर आजपासून राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेस शानदार प्रारंभ झाला. ग्रामीण भागात या स्पर्धेमुळे फुटबाॅलचा फिव्हर पहायला मिळू लागला आहे. खा. श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव, राष्ट्रवादी काँग्रेस माहीती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग (बाबा) पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील 30 संघानी सहभाग घेतला.

स्पर्धेच्या उद्घाटन सरपंच शोभाताई शिंदे, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, यशवंत एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन निवासराव पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, पाटण अर्बन बॅंकेचे व्हा. चेअरमन धनंजय ताटे, मुख्याध्यापक एस. व्ही. पोळ, विठोबा पवार, संतोष कुंभार, शंकर पाटील, तात्यासाहेब पाटील, राष्ट्रीय धावपट्टू अतुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजदिप पवार यांनी प्रास्ताविक केले. तर दादासो शिंदे यांनी आभार मानले.

या स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संघानी सहभाग घेतला आहे.  सारंग (बाबा) पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करुन पाटण विरुद्ध उंब्रज यांच्यातील सलामीच्या सामन्यास सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी जगातील मोठ- मोठ्या फुटबाॅल खेळाडूंचे पोस्टर्स लावले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 27 हजार, 18 हजार, 10 हजार व 4 हजार 500 रूपये आणि चषक देवून गाैरविण्यात येणार आहे. मोस्ट व्हॅलूयेबल प्लेयर, बेस्ट गोल किपर आणि टाॅप स्कोअरर यांना रोख रक्कम 1 हजार 1 रूपये देण्यात येणार आहेत.